राम दातीर माहूर (प्रतिनिधी) येथील नगर पंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत झालेल्या महाघोटाळ्या...
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी) येथील नगर पंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत झालेल्या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी ठोस मागणी आमदार भीमराव केराम यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि. 13 फेब्रुवारी रोजी पाठविलेल्या लिखित तक्रारीतून केली आहे.
आ. केराम यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सन 2017 ते 2025 या कालावधीत नगरपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेतील अनेक पात्र लाभार्थ्यांना तिसरा व चौथा हप्ता अद्याप मिळालेला नाही. परिणामी, अनेक कुटुंबांची घरे अर्धवट अवस्थेत पडून असून लाभार्थ्यांची आर्थिक व मानसिक परवड होत आहे.
तसेच, योजनेसाठी प्राप्त झालेला सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांना वितरित न करता तो इतर कामांसाठी वापरण्यात आल्याचा उल्लेख मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठविलेल्या पत्रात केला असल्याचेही त्यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे.
नगरपंचायत संचालनालय, मुंबई यांनी वारंवार सूचित करूनही संबंधित रक्कम व्याजासह वर्ग करण्यात आलेली नाही. परिणामी, अनेक पात्र लाभार्थी त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. घरकुल लाभार्थ्यांची सध्याची दयनीय अवस्था लक्षात घेता त्यांचे उर्वरित अनुदान तात्काळ वितरित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यासोबतच, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका आ. केराम यांनी मांडली आहे.दरम्यान,प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा विषय आगामी अधिवेशनात विधानसभा सभागृहात लक्षवेधीद्वारे मांडणार, असा इशाराही आ. भीमराव केराम यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे माहूर शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून लाभार्थ्यांच्या नजरा आता शासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

COMMENTS