नांदेड प्रतिनिधी) : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद...
नांदेड प्रतिनिधी) : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळा, ता. व जि. नांदेड येथे 101 पुस्तकांची ‘आनंदी वाचन पेटी’ भेट देण्यात आली. हा उपक्रम होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेच्या वतीने लोकसहभागातून राबविण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक आणि वाचन चळवळ समन्वयक प्रकाश डूबे यांच्या हस्ते वाचन पेटीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक भरतकुमार ठाकर यांनी पुस्तक स्वरूपात दातृत्व दाखविले, तर प्रा. डॉ. शिवा आयथळ यांनी आर्थिक सहयोग दिला. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाचा अमूल्य खजिना पोहोचला.डॉ. पवन चांडक यांनी ‘आनंदी वाचन पेटी’ हा उपक्रम म्हणजे वाचन चळवळ असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला पुस्तके भेट देऊन ग्रंथालय समृद्ध करावे, असे आवाहन केले. तसेच संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. वाचन चळवळ समन्वयक प्रकाश डूबे यांनी मराठी भाषेविषयी जागरूकता वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्काराचे बीज रुजवण्यासाठी ही आनंदी वाचन पेटी भेट देत असल्याचे सांगितले. तसेच हॅन्ड, हेड आणि हार्ट चा विकास करणारे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.तसेच एचएआरसी संस्थेच्या वतीने आजवर लोकसहभागातून संभाजीनगर, नांदेड, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, पुणे, नाशिक व वाशिम जिल्ह्यातील तब्बल 185 जिल्हा परिषद शाळांना ‘आनंदी वाचन पेटी’ भेट देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आनंदी वाचन पेटीमध्ये पुस्तकांचा खजिना या वाचन पेटीमध्ये कथा, कविता संग्रह, महापुरुष व शास्त्रज्ञांची चरित्रे तसेच विविध विषयांवरील पुस्तके असून मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांतील साहित्याचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पोहरे यांनी तर आभार प्रदर्शन रामेश्वर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंजाजी जोगदंड, विद्या गंजेवार, पद्मिनी पानपटवार, प्रणिता करनेवार, प्रतिभा पाटील यांनी प्रयत्न केले.

COMMENTS