मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने सत्कार
नांदेड - मुखेड तालुक्यातील उच्चा या खेडेगावात जन्म घेतलेले व आता जालना जिल्ह्यातील अंबड येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांची चेन्नई येथे पार पडलेल्या इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन 108 या अधिवेशनात महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून एक्झिक्युटी कमिटीवर त्यांची तीन वर्षासाठी बिनविरोध निवड झाली आहे. देशभरातून उपस्थित असलेल्या हजारो आजीव सदस्यांच्या साक्षीने झालेली ही निवडणूक व त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्रावरून नांदेड जिल्ह्याला अभिमान वाटावा असाच आहे. त्यामुळे या अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांचा मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले मी मुखेड तालुक्यातील उच्चा या खेडेगावात जन्म घेतला असून इयत्ता आठवी पर्यंत आम्हाला इंग्रजी विषय शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध झाले नव्हते तरी जिद्द, चिकाटी व पॉझिटिव्ह विचार करून पुढे जात राहिलो म्हणून ही संधी आज प्राप्त झाली असे सांगून संघटने विषयी मत व्यक्त करताना ते म्हणाले कर्मचाऱ्यावर अनेक गंडांतरे येत असून पुढील काळात आपल्यासाठी फार अवघड काळ आहे. यातून आपल्याला वाचायचे असेल संघटन शक्ती आवश्यक आहे. त्यासाठी संघटनेची ताकत वाढविणे आवश्यक आहे. आपण आपल्या घरातील व्यक्तींच्या वाढदिवसासाठी जसा वेळ काढतो त्याप्रमाणे संघटना वाढविण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे असे सांगून आजपर्यंत जे काही मिळाले हे सर्व संघटनेमुळे मिळाले याची आठवण करून दिली. याप्रसंगी मराठवाडा शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव त्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष व्ही आर. चिलवरवार,आभार विजयालक्ष्मी स्वामी यांनी मानले, याप्रसंगी शहराध्यक्ष डी बी नाईक, जयवंत शिंदे, बाबाराव घाटे, कपाटे सर, आतनूरकर, राम येडते, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS