महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकस्मात दुःखद निधनाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आज विद्...
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकस्मात दुःखद निधनाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आज विद्यापीठाच्या वतीने दि.२९ जानेवारी रोजी मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.या श्रद्धांजली सभेला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेदरम्यान सर्व उपस्थितांनी दिवंगत नेत्यास दोन मिनिटांचे मौन राखून आदरांजली अर्पण केली. विद्यापीठाच्या वतीने उज्ज्वल पद्धतीने त्यांच्या सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कार्याचा तथा महाराष्ट्र व देशासाठी केलेल्या योगदानाचा भावपूर्ण स्मरण केला गेला. सभा शांत व शोकमय वातावरणात पार पडली.

COMMENTS