आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत परभणी च्या अद्या बाहेतीला सुवर्ण पदक

 

परभणी  जागतिक व भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वतीने वडोदरा गुजरात येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक युवा टेबल टेनिस  मालिकेत परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेचे वतीने आद्या पूजा महेश बाहेती ने भारताचे प्रतिनिधित्व करत अकरा वर्षे मुलींच्या वयोगटात अंतिम फेरीत साक्षा संतोष या खेळाडू वर एकदम सोपा 3-0 (15-13,11-8,12-10)  असा  विजय मिळवत  देशाला सुवर्ण पदक  मिळवून दिले. आद्या ही जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवून देणारे पहिली खेळाडू ठरली. स्पर्धेत एकूण 10 देशामधील 350 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या पदकासोबत तिने जिल्ह्य, राज्य व देशाचे नाव उज्वल केले.

       आद्या बाहेती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व भारतीय खेल प्राधिकरण यांच्या अंतर्गत चालणाऱ्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र परभणी येथे प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्याकडे प्रशिक्षण घेते. नुकत्याच पार पडलेल्या वडोदरा येथे स्पर्धा ठिकाणी अनिल बंदेल यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.

अनिल बनदेल हे चेतन मुक्तावार यांचे प्रशिक्षक व मार्गदर्शक आहेत. मागील पंचवीस वर्षापासून ते टेबल टेनिस प्रशिक्षणाचे कार्य करतात ते महाराष्ट्र शासनात क्रीडा मार्गदर्शक या पदावर कार्यरत आहेत. अनिल बंदेल यांच्या अनुभवा मुळे आद्याचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी चेतन मुक्तावार यांना खूप मदत होते. तसेच सरावासाठी सचिन पुरी, असद आली, अजय कांबळे, ईश्वर कदम ह्या भारतीय खेळ प्राधिकरण यांच्याकडून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळते. तर ऐश्वर्या पाटील फिजिओ तर कांचन वसेकर योग प्रशिक्षक म्हणूनआद्या सोबत कार्य करतात. आद्या स्कॉटिश अकॅडमी या शाळेत इयत्ता पाचवी मध्ये शिकते.

                 या यशा बद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता,महाराष्ट्र राज्य टे.टे, राज्य अध्यक्ष प्रवीण लुकड,राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस,  जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले, क्रीडा अधिकारी साळवे, सुयश नाटकर, रोहन औढेंकर  परभणी  जिल्हा सचिव तथा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, परभणी क्लबचे सचिव डॉ.विवेक नावंदर, सराव सवंगडी विक्रम हातेकर, पवन कदम, पियूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी,साक्षी देवकाते, भक्ती मुक्तावार या वरिष्ठ खेळाडू, पालक  यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या