बहुआयामी प्रतिभेचे मुख्याध्यापक श्री.नितीन सेलमोकर सर

  मुख्याध्यापक श्री.नितीन सेलमोकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विशेष लेख.   शिक्षण क्षेत्रातील एका यशस्वी अध्यायाला आज निरोप देताना हृदय  भा...

 

मुख्याध्यापक श्री.नितीन सेलमोकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विशेष लेख. 

 शिक्षण क्षेत्रातील एका यशस्वी अध्यायाला आज निरोप देताना हृदय  भावनांनी भरून येते. लातूर जिल्ह्यात ११ जानेवारी १९६८ रोजी जन्मलेले श्री. नितीन सोलमोकर हे मराठवाड्यातील नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूलमध्ये १३ जुलै १९९२ रोजी कला शिक्षक म्हणून रुजू झाले. ही संस्था स्वामी रामानंद तीर्थ व गोविंदभाई श्रॉफ यांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेली मराठवाड्यातील सर्वात जुनी व नामवंत शैक्षणिक संस्था आहे. येथे शिक्षक म्हणून काम करण्याचे भाग्य त्यांना लाभले, ज्याचा त्यांनी पूर्ण सन्मान राखला. ३३ वर्षे ७ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी आपल्या बहुआयामी प्रतिभेचे दर्शन घडविले. 

               शिक्षणात ATD, BFA, MA, AM अशी उल्लेखनीय पदवी असलेले श्री. सेलमोकर यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांमध्ये दरवर्षी ९६ ते ९९ टक्के विद्यार्थ्यांचा निकाल आणून  शाळेचा गौरव वाढविला. कला अध्यापक संघ जिल्हा मंडळात उपाध्यक्ष म्हणून तीन वर्षे व सहसचिव म्हणून पाच वर्षे जबाबदारीने काम केले. 

            साक्षरता अभियानात ३५ दिवस अथक परिश्रम करून सामाजिक दायित्वाचे पालण केले. उत्कृष्ट चित्रकार म्हणून अनेक मनमोहक पेंटिंग्ज साकारल्या, तर 'व्हॉईस ऑफ किशोर कुमार' म्हणून ओळखले जाणारे उपजत गोड गळ्याचे गायक म्हणून संगीत समारंभात आपल्या गायनाने सभागृह गाजवली. विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत ते विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. 

              शाळेच्या शिक्षिक पदभरती प्रक्रियेत पुढाकार घेतला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटीने त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. पदोन्नतीनंतर पर्यवेक्षक व नंतर मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले. पी.जी. कुलकर्णी, स.रा. गाडगीळ, शास्त्री, लिमये, चक्रवार, पाठक, साब्दे, पांडे, क्षीरसागर, पी.जी. मोरे अशा नामवंत मुख्याध्यापक परंपरेचा वारसा असलेल्या पीपल्स हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून पदभार सांभाळणे हे त्यांचे भाग्य होते.    

               सर्व शिक्षकांना समदृष्टीने पाहत शाळेची दैनंदिन कामे यशस्वीपणे पार पाडली.श्री. सेलमोकर यांची गुणवैशिष्ट्ये तर लोभस आहेत! बोलका स्वभाव, मित्र असो वा शत्रू, मन मोकळे करणारा  दिलखुलास स्वभाव, भावनांना मोकळी वाट करून देणारी उदारता – हे सर्व त्यांना अवलिया बनवते. खवय्या म्हणून विविध खाद्यपदार्थांमध्ये रुची असलेले ते खऱ्या अर्थाने जीवनसंगी साथीदार आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या सेवानिवृत्तीने शाळा काहीशी शून्य झाली असली तरी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. नितीन सोलमोकर सारखे शिक्षकच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मिती करतात. त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • राहुल गोरे 
  • कार्यकारिणी सदस्य, नांदेड एज्युकेशन सोसायटी, नांदेड.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel