उमरी प्रतिनिधी.. संपूर्ण विश्वाचे निर्मिते ब्रह्मा, विष्णु, महेश जरी असले तरी साक्षात रचनाकार , अर्थातच अभियंता भगवंत विश्वकर्मा हेच होते. ए...
उमरी प्रतिनिधी.. संपूर्ण विश्वाचे निर्मिते ब्रह्मा, विष्णु, महेश जरी असले तरी साक्षात रचनाकार , अर्थातच अभियंता भगवंत विश्वकर्मा हेच होते. एवढेच नाही तर श्रीकृष्णाची द्वारका रावणाची लंका, आणि श्रीरामाचे आयोध्या , याची निर्मिती ही भगवान विश्वकर्मांनीच केली आहे. एवढेच नव्हे तर धर्मावर अधर्म भारी पडत असताना श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्रही भगवंत विश्वकर्मांनीच बनवले आहे असे सुतोवाच विश्वकर्मा जयंती महोत्सव नमित्त दिनांक 31 जानेवारी रोजी हडको सिडको येथील किर्तन महोत्सवात ह भ प दत्तात्रय महाराज वळसंगवाडीकर केले आहे. विश्व निर्मितीचे महामेरू भगवंत विश्वकर्मा यांची जयंती इको हडको नांदेड 115 येथे दिनांक 31 रोजी साजरी करण्यात आली या निमित्ताने , या कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रतिनिधी सतीश बस्वते, नगरसेवक संजय पाटील घोगरे, महेश शिंदे सिडको काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष, शिवाजी हंबर्डे संभाजी सेना जिल्हाध्यक्ष नांदेड, बाळासाहेब जाधव टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष नांदेड, यांचे सह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना हभप डॉ दत्तात्रय महाराज वळसंगवाडीकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विश्व निर्मितीची संरचना करत असताना भगवंत विश्वकर्मा देवांनी मुख्य भूमिका निभावली असून, समाजाच्या भविष्यातील सुविधेसाठी त्यांच्या पाचही पुत्रांना, लोहार , सोनार ,सुतार ,तांबेकर ,व मूर्तिकार या स्वरूपाची कामे देऊन समाज रुढी परंपरा चालू ठेवण्याची जिम्मेदारी त्यांच्यावर सोपवली आहे, म्हणूनच आज पांचाळ समाजातील पाच बलुतेदार समाजसेवेत कार्यरत आहे. यानंतर जयंती महोत्सवात संतोषी माता महिला भजनी मंडळ यांनी आपल्या भक्ती गीताने श्रोत्यांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून हजारो लोहार समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS