उदगीर (लोणी) | प्रतिनिधी: "उदगीर आणि जळकोट परिसरात हजारो कोटी रुपयांचा निधी आणल्याच्या गप्पा मारल्या जातात, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर कामे दिसत नाहीत. येथे केवळ टक्केवारी आणि कमिशनखोरीचा खेळ सुरू असून, सरकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेऐजी केवळ कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या खिशात जात आहे." ही टीका माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
लातूर जिल्हा परिषद आणि उदगीर पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने सोमनाथपूर जिल्हा परिषद गट व गुडसूर-सोमनाथपूर पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ लोणी येथील हनुमान मंदिर चौकात शनिवारी (३१ जानेवारी) जाहीर सभा पार पडली.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आवाहन
सभेला संबोधित करताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यासाठी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे. "आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. शासनाच्या योजना लोकांसाठी राबवायच्या असतील आणि दर्जेदार कामे करायची असतील, तर समाजाशी बांधिलकी असलेला काँग्रेस पक्षच पर्याय आहे," असेही त्यांनी नमूद केले.
भाजपला कार्यकर्त्यांचा धक्का
या सभेदरम्यान भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. भाजपचे तालुका उपाध्यक्ष शिवकांत मुळे आणि लोणी गावातील धडाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब अशोक गायकवाड यांनी शेकडो समर्थकांसह आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
सभेतील प्रमुख उपस्थिती व मान्यवर:
या प्रचार सभेस महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते:
बसवराज पाटील नागराळकर: (ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस - शपप)
शिवाजीराव हुडे, कल्याण पाटील, पद्माकर उगीले
प्रशांत मोरे: (तालुकाध्यक्ष, शिवसेना - उबाठा)
नागनाथ बोडके: (जिल्हाध्यक्ष, रासप)
उमेदवार ज्यांच्यासाठी सभा झाली:
जयश्री मनोहर तोंडारे: (सोमनाथपूर जिल्हा परिषद गट)
सुनीता राहुल घोणसे: (गुडसूर पंचायत समिती गण)
छायाबाई बालाजी हैबतपुरे: (सोमनाथपूर पंचायत समिती गण)
मुकेश भालेराव, शिवाजीराव मुळे: (जिल्हा परिषद गट उमेदवार)
"भारतीय संविधानाने देश चालला पाहिजे. सध्या महागाई प्रचंड वाढली असून लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी माजी मंत्री अमित देशमुख यांच्या पाठीशी उभे राहावे." — बसवराज पाटील नागराळकर, ज्येष्ठ नेते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमजद पठाण यांनी केले, तर विवेक जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी (शपप) आणि शिवसेना (उबाठा) आघाडीचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)
COMMENTS