नायगाव प्रतीनीधी: जिल्हा परिषद उपअभियंता बांधकाम उपविभाग कार्यालय, नायगाव येथील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर बोलूरे नावाच्या कर्मचाऱ्याने ग...
नायगाव प्रतीनीधी:जिल्हा परिषद उपअभियंता बांधकाम उपविभाग कार्यालय, नायगाव येथील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर बोलूरे नावाच्या कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज शनिवार, दिनांक 31 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. सदर कार्यालय जुनी पंचायत समितीची इमारत, नायगाव शहर येथे कार्यरत आहे. बलुरे हे लोहा तालुक्यातील लांडगेवाडी येथील असल्याचे कळले आहे ते सध्या नायगाव शहरात वास्तव्यास असल्याचेही समजले आहे.सकाळी कार्यालयाच्या खालच्या गेटला कुलूप लावलेले असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी कार्यालयासमोर अज्ञात दुचाकी धुळखात पडलेली दिसल्याने संशय निर्माण झाला. नागरिकांनी वरच्या मजल्याकडे पाहिले असता, कोणीतरी गळफास घेतल्याचे दिसत होते.
घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस स्टेशनचे स.पो निरीक्षक व त्यांचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाला असला तरी अद्याप दुरून चौकशी चालू आहे कारण नातेवाईकाचे कोणीही आले नसल्याने प्रेत खाली उतरवण्यात आले नाही तसेच,घटना नायगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली असून नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली आहे. विशेष म्हणजे, घटना उघडकीस येऊन बराच वेळ होऊनही मयताचे नातेवाईक अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाहीत, त्यामुळे प्रेत अजूनही खाली उतरवलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, “नातेवाईक आल्यानंतरच पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल.”
सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी असून या घटनेमुळे नायगाव शहरात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता देखील घटनास्थळी दाखल झाले व संबंधिताची माहिती दिली की बोलूरे हे नायगाव बांधकाम विभागात सहायक अभियंता म्हणून कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांची देगलूर येथे पदोन्नती झाली होती. मात्र सध्या ते नायगाव येथे डेपोटेशनवर कार्यरत असल्याची माहिती आहे.
संबंधित वरीष्ट अभियंत्यांनी सांगितले की, काल कार्यालयात केवळ सेवक उपस्थित होते, इतर कर्मचारी नव्हते. आज शनिवार असल्याने कार्यालय बंद होते. त्यामुळे ही घटना नेमकी कधी घडली, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

COMMENTS