नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या नांदेड विभागाच्या एसटी डेपो नांदेड आगारात कार्यरत असलेले एसटी बस डेली मेंटन्स मेकॅनिक तथा...
नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या नांदेड विभागाच्या एसटी डेपो नांदेड आगारात कार्यरत असलेले एसटी बस डेली मेंटन्स मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत हणमंतराव मिसलवाड हे प्रदिर्घ सेवेनंतर सलग 37 वर्षे उत्कृष्टरित्या सेवा बजावून एसटी महामंडळाच्या प्रवाशी सेवेमध्ये उत्तमरित्या कर्तव्य बजावून उद्या दि.31 जानेवारी 2026 शनिवार रोजी सेवानिवृत्त (सेवापूर्ती) होणार असून त्यांचा सेवापूर्तीनिमित्त संपूर्ण एसटी डेपो नांदेड आगाराच्या आस्थापनेच्यावतीने व कष्टकरी कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनींच्यावतीने व सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा रापम आगारात सत्कार सोहळा निरोप समारंभ कार्यक्रम होणार आहे.एसटी मेकॅनिक मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड यांची एसटी महामंडळाच्या नांदेड विभागात एसटी बस दैनिक देखभाल (डेली मेंटन्स) मेकॅनिक म्हणून ख्याती असून ते दररोजच्या ड्युटीमध्ये गुणवत्तापूर्वक व आपल्या कार्य कौशल्याने, प्रामाणिकतेने दररोज चाळीस ते पन्नास एसटी बस डेली मेंटन्स करतात. म्हणून त्यांची तमाम एसटी महामंडळाच्या नांदेड विभागात उत्कृष्ट कामगार म्हणून विशेष ओळख (किर्ती) आहे.
COMMENTS