नांदेड :(दि.३१ डिसेंबर २०२५)
यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि.२९ डिसेंबर ते ०४ जानेवारी या कालावधीत मोजे येळेगाव, ता. जि. नांदेड येथे संपन्न होत आहे.
' शाश्वत विकासासाठी युवक: विशेष संदर्भ पाणी व्यवस्थापन आणि नापिक जमिनीचा विकास' या विषयावर आधारित शिबिराचा उद्घाटन समारंभ दि.३० डिसेंबर रोजी पार पडला.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरस्वतीबाई रामचंद्र गंगातिरे (सरपंच, मोजे येळेगाव) होत्या तर उद्घाटक म्हणून आ. श्रीजयाताई अशोकराव चव्हाण (भोकऱ विधानसभा मतदारसंघ) होत्या. प्रमुख अतिथी श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ.रावसाहेब शेंदारकर होते. माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरादरम्यान युवकांमध्ये शाश्वत विकासाबाबत जनजागृती, जलसंधारण, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पडीत जमिनीचा विकास, स्वच्छता, वृक्षारोपण तसेच सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
उद्घाटनप्रसंगी आ.श्रीजयाताई चव्हाण यांनी अशा शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या शिबिरामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन विद्यार्थी समाजाशी जोडला जातो. याप्रसंगी त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला.
डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. तर प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थी घडवण्याची एक व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केले
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलाश इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. राजश्री भोपाळे, प्रा. अभिनंदन इंगोले आणि डॉ. कांचन गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच येळेगाव येथील आनंदराव सावते (उपसरपंच), भगवानराव तिडके (उपसरपंच), यशवंतराव राजेगोरे (तालुका अध्यक्ष), बालाजीराव कदम (सरचिटणीस), आनंदराव कपाटे (माजी सभापती), वसंतराव कपाटे (संचालक), नवनाथ कपाटे, अमोल कपाटे, ईश्वर कपारे, प्रभू कपाटे, अशोक कपाटे व गजानन कपाटे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, नाना शिंदे आदींचे सहकार्य लाभत आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा