उदगीर/ प्रतिनिधी : येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादीचे राजकुमार भालेराव हे पाचव्यंदा निवडून आले असून तब्ब्ल 1400 मताधिक्याने विजयी झाले आहेत. उदगीर शहरातील एक अतिशय नम्र, अभ्यासू, काम करणारा व प्रामाणिक नगरसेवक म्हणून ओळख असलेले तसेच सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे तसेच विकासाची गंगा सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे, निडेबन वेस , कंधार वेस, बोधन नगर, अलअमीन नगर, राजा भगीरथ नगर, आझाद नगर, सन्मित्र नगर, शिवशक्ती नगर ,नेताजी सुभाषचंद्र बोस काॅलनी, आदर्श कॉलनी, भोई गल्ली , कोळी गल्ली,वडार गल्ली तसेच अशोक नगर येथील जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेले, येथील सुखाचे साथीदार व दुःखाचे भागीदार असलेले सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी क्षणात धावुन येणारे तसेच जनतेच्या मनात घर करून अधिराज्य गाजवणारा उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आहे. उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालय,येथे विद्यार्थी प्रतिनिधी CR म्हणून तथा विद्यापीठ प्रतिनिधी UR म्हणून नेतृत्वाची सुरुवात केली... सलग पाचव्यांदा जिंकून अपराजित असलेले व प्रशासनावर मजबूत पकड असलेले तसेच एक अभ्यासू नगर परिषद सदस्य ते पण एक अतिशय सामान्य कुटुंबातुन स्वकृतुत्वाने शुन्यातुन विश्व निर्माण करणारे तसेच अतिशय प्रेमळ, सोज्वळ,नम्र, प्रामाणिक तथा स्वाभिमानी नेतृत्व राजकुमार श्रीपती भालेराव साहेब..तुमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ..
उत्तुंग कर्तृत्वा चरणी..
आमचा सदा टेकतो माथा..
छाती हि फुगुन येते अभिमानाने
गाथा तुमच्या कर्तृवाची गाथा!
प्रा. संजय जामकर
उदगीर

addComments
टिप्पणी पोस्ट करा