नांदेड:(दि.१ जानेवारी २०२६)
यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित मौजे येळेगाव येथील वार्षिक निवासी शिबिरातील बौद्धिक क्षेत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना यशवंत महाविद्यालयातील मराठी साहित्यातील लेखक व वक्ते डॉ. विश्वाधार देशमुख यांनी, नैतिक महामंदी हे युवकांसमोरील अत्यंत गंभीर आव्हान असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभागातील डॉ.विजय भोसले होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विश्वाधार देशमुख यांनी भूमिका बजावली.
पुढे बोलताना डॉ. विश्वाधार देशमुख यांनी, भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचे आचरण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचा अंगीकार करणे आज अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुदृढ मानसिकतेचा युवक घडवणे हे समाजासमोरील मोठे आव्हान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. विजय भोसले यांनी, युवकांना व्यसनांपासून तसेच मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्याचे आवाहन केले. सध्याच्या काळात अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सूत्रसंचालन शुभम राठोड यांनी तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले यांनी केले. शेवटी आभार संविधान कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा