माजी प्राचार्य बी.एन. चव्हाण यांचे निधन


नांदेड ः येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.एन. चव्हाण (वय 84) यांचे एका खाजगी रूग्णालयात आज निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. याच महाविद्यालयात अनेक वर्षे त्यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिले. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे सख्खे चुलत भाऊ व भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांचे ते वडिल होते.

प्राचार्य बी.एन. चव्हाण यांचे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यासोबतच जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका वठविली. मराठवाडा विद्यापीठाच्या नांदेड उपकेंद्राचे ते अनेक वर्षे संचालक होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला होता. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. सौ. अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आ. अमरनाथ राजूरकर, आ. श्रीजयाताई चव्हाण यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा चव्हाण, मुलगा नरेंद्र्र चव्हाण व मोठा परिवार आहे. उद्या बुधवार दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या