डॉ. सुरेश सावंत यांना बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

  बालदिनाचे औचित्य साधून, आज नवी दिल्लीत ज्येष्ठ बालसाहित्यकार तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या बालसाहित्यातील महत्त्वपूर्ण ...

 


बालदिनाचे औचित्य साधून, आज नवी दिल्लीत ज्येष्ठ बालसाहित्यकार तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या बालसाहित्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या 'आभाळमाया' ह्या बालकवितासंग्रहाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हे पुस्तक पुण्यातील चेतक बुक्स ह्या प्रकाशन संस्थेने अतिशय आकर्षक स्वरुपात प्रकाशित केले आहे. २४ भारतीय भाषांमधील बालसाहित्यकारांचा या वेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त सर्व साहित्यिकांमध्ये डॉ. सावंत हे सर्वाधिक पुस्तके प्रकाशित असलेले पहिले साहित्यिक ठरले आहेत. 


पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. माधव कौशिक हे होते. आरंभी साहित्य अकादमीच्या सचिव पल्लवी प्रशांत होळकर यांनी स्वागतपर प्रास्ताविक भाषण केले. या वेळी ज्येष्ठ गुजराती लेखिका वर्षा दास यांचे प्रमुख भाषण झाले. साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष डॉ. कुमुद शर्मा यांच्या भाषणाने सोहळ्याचा समारोप झाला. 


डॉ. सावंत यांची आजवर ५६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ३३ पुस्तके बालसाहित्याची आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन पुरस्कारांसह अन्य प्रतिष्ठित साहित्यसंस्थांचे ४५ पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. पुणे येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच त्यांना कुसुमताई चव्हाण जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. डॉ. सावंत यांचे साहित्य शालेय तसेच विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट झाले आहे. त्यांच्या एकूण बालकवितेवर संशोधन करून एका विद्यार्थ्याने एम. फिल. ही पदवी संपादन केली आहे. अनेक विद्यापीठांत त्यांच्या बालसाहित्यावर संशोधन होत आहे. 

डॉ. सुरेश सावंत यांची १) वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती, २) बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध, ३) आजची मराठी बालकविता, आणि ४) बालसाहित्यातील नवे काही ही पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहेत. डॉ. सावंत यांनी कुंटूर, जळगाव आणि पैठण येथे संपन्न झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. सावंत यांनी १२७ पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत किंवा पाठराखण केली आहे. अलीकडेच शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेले आणि संतोष तळेगावे यांनी संपादित केलेले 'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel