माहूर (प्रतिनिधी) श्रीक्षेत्र माहूर शहरात आज विविध ठिकाणी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील बिरसामुंडा चौकात विविध सामाजिक, आदिवासी व युवक संघटनांनी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन, माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नगरसेवक देविदास सिडाम, नगरसेवक कमटेवाड, दांडेगावकर, टेकाम, जेष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी, अविनाश टनमने,सुरेंद्र पांडे, विनोद मार्गांमवार, कन्नेवाड भावजी, अशोक उप्पलवाड, पोस्पूलवार सर, गजनान चव्हाण, रवी मार्गमवार यांचे सह स्थानिक आदिवासी समाज, विद्यार्थी संघटना, महिला बचत गट तसेच शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्त्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा