थोरंदळे गावातील किसन विश्वासराव यांचे दुःखद निधन


पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात थोरांदळे  गावात अनेक वर्षे एकत्र कुटुंब चालविणारे, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे कुटुंबप्रमुख आणि  कामगार नेते मारुती विश्वासराव यांचे वडील श्री. किसन शिवराम विश्वासराव यांचे  ४ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी  वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.  त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील  त्यांच्या थोरांदळे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक १४  ऑक्टोबर  २०२५  रोजी थोरांदळे गावी  होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी भामाबाई, मुलगे मारुती, रामहरी, नरहरी, दत्तात्र्य,  मुली कमल,  पुष्पा, पुतणे अशोक, खंडू, पुतणी  विमल तसेच सुना , नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. या सर्व परिवाराने त्यांची शेवटपर्यंत खुप काळजी घेतली.  किसन शिवराम विश्वासराव हे थोरांदळे गावच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असत. पूर्वी ते मुंबईला नोकरी करीत होते.पण नंतर त्यांनी आपल्या गावी राहून शेती करणे पसंद केले.काही दिवस त्यांनी गावी किराणा मालाचे दुकानही चालविले. पूर्वीच्या काळात त्यांनी शेतामध्ये खूप कष्टाची कामे केली होती. किसन विश्वासराव यांना विश्वासराव परिवार आणि सर्व नातेवाईकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पण्या