पुणे : मुंबई पोर्टच्या सेवानिवृत्त गोदी कामगारांचा तिसरा आनंद मेळावा ५ ऑक्टोंबर २०२५ रोजी पुणे नाशिक हायवेच्या १४ नंबर जवळील माई वडवाले सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आनंद मेळाव्याला मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायरमेंट एम्प्लॉईज असोशियनचे अध्यक्ष सी. जे. मेंडोसा, सचिव धिंग्रेजा, ऑल इंडिया रिटायरमेंट असोसिएशनचे सचिव टिकेकर, ट्रान्सपोर्ट अँड डाँक वर्कर्स युनियनचे सचिव बबन मेटे, असोसिएशनचे पदाधिकारी कोलॅसो, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेश पूजन व दीप प्रज्वलन करून हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, गोदी कामगार नेते कॉ.एस.आर. कुळकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावर्षी जे सेवानिवृत्त कामगार निधन झाले तसेच देशाच्या सीमेचे रक्षण करत असताना ज्या शूर वीरांना वीर मरण आले ,तसेच कॉ. मोहम्मद हनीफ, मारुती विश्वासराव यांचे वडील कै. किसन शिवराम विश्वासराव या दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सेवानिवृत संघाचे कार्याध्यक्ष डी.बी. बांगर यांनी केले. तर सेवानिवृत्त संघाचे संस्थापक अध्यक्ष गेनभाऊ पांडुरंग बांगर यांनी संघाचा जमा खर्च तसेच ग्रामीण भागात अनेक सेवानिवृत्त कामगार राहतात त्यांना आरोग्य विषयक येणाऱ्या अडचणी, व सेवानिवृत्तांचे अनेक प्रश्न मांडले. यामध्ये अनेक सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांनी चर्चेत भाग घेतला.
पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. जे. मेंडोसा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, पेन्शनर्सना दिवाळीपूर्वी थकबाकी मिळेल. पुणे शहरात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पॅनलवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिळावे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन अर्ज करावा. त्याबाबत आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करू. आपणास पेन्शन व वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे मिळत असून, आपल्या काही तक्रारी असतील तर जरूर आम्हाला संपर्क साधा. मात्र भविष्यात आपल्या मागण्या मिळविण्यासाठी पेन्शनर्सनी आपली एकजूट कायम ठेवावी. सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष जिजाभाऊ औटी यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वांनी स्नेहभोजन करून एकमेकांचा निरोप घेतला. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरण सेवानिवृत्त संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्वश्री गेनभाऊ पांडुरंग बांगर, कार्याध्यक्ष डी. बी. बांगर, उपाध्यक्ष अनिल औटी, जिजाभाऊ औटी, सचिव तुकाराम औटी ,सहसचिव पोपट भोर, खजिनदार शांताराम टाव्हरे, सहखजिनदार, दशरथ पताडे, कमिटी सदस्य बाळकृष्ण थोरात, दत्तु पडवळ, आत्माराम वाळुंज, बाळू निघोट, दौलत दुराफे, दत्तु लामखडे, किशन पानसरे , लक्ष्मण लांडगे, बाबुराव जाधव, रामचंद्र हांडे व इतर कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा