वाढदिवसाचा खर्च टाळून एडके यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 25 हजाराची मदत

 

नांदेड प्रतिनिधी :
नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारक संघटनेचे
जिल्हाध्यक्ष अशोक एडके यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सामाजिकबांधीलकी जोपासत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरग्रस्त शेतकरी, कामगार,मजुर यांच्यासाठी  २५ हजार रुपयांचा  चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी खा. अशोकराव चव्हाण यांचेकडे   ०४ ऑक्टोबर रोजी  सुपूर्द केला.यावेळी नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष  अशोक जयवंतराव एडके यांच्यासह   लेबर फेडरेशन चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, लेबर
फेडरेशनचे व्हाईस चेअरमन शाहूराज गायकवाड, कार्याध्यक्ष  अब्दुल सलीम
अब्दुल मुनीर, उपाध्यक्ष अशोक गायकवाड, कोषाध्यक्ष बळवंत सुर्यवंशी,
सरचिटणीस अनिल पुरुषोत्तम कुलकर्णी, शहराध्यक्ष विठ्ठलराव
ठाकूर,ज्ञानेश्वर उकरंडे,  म.सादिक मरखेलकर,अब्दुल कलीम अब्दुल सलीम,
मो.मुजाहेद, अब्दुल नदिम अब्दुल सलीम,शेख जावेद, मो.अमान,
मो.फैसल,मो.शारेख,मो. वसीम, मो.फारुख, मो.कफील, सुनिल पटकोटवार यांच्यासह
 शहरातील रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारक उपस्थित होते.

टिप्पण्या