एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्यन न झाल्यास १३ ऑक्टोबर आंदोलनाचा इशारा*

मुंबई: महाराष्ट्र शासनाने  एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्य न केल्यास,  एसटी कामगार  १३ ऑक्टोबर २०२५ पासून ऐन दिवाळीत आंदोलन करतील,  अ...

मुंबई: महाराष्ट्र शासनाने  एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्य न केल्यास,  एसटी कामगार  १३ ऑक्टोबर २०२५ पासून ऐन दिवाळीत आंदोलन करतील,  असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने  ३० सप्टेंबर २०२५ रोजी  मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या प्रशासनाला दिला आहे.  कामगार कराराच्या तरतुदीनुसार एस.टी. कामगारांना राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू करण्याचे मान्य केलेले आहे. असे असताना घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीच्या दरामध्ये एकतर्फी कपात करून कामगार कराराच्या तरतुदीचा एस.टी. प्रशासनाने भंग केलेला आहे. याबाबत प्रशासनाने पाठपुरावा केल्यानंतर नोव्हेंबर २०२१ पासून शासकीय दराने घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर एस.टी. कामगारांना लागू करण्यात आला. मात्र  एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंतची वाढीव दराची थकबाकी प्रलंबित असून ती मिळालीच पाहिजे.  तसेच  २०१८ पासून महागाई भत्याची थकबाकी प्रलंबित आहे. याबाबत मा. औद्योगिक न्यायालय, मुंबई यांनी थकबाकी देण्याबाबतचा निर्णय देऊनसुध्दा प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही.

 एप्रिल २०२० पासून एस.टी. कामगारांच्या मूळ वेतनात रू.६५००/- वाढ करून वेतन निश्चिती करण्यात आली व सदर वेतन निश्चितीनुसार  एप्रिल २०२४ पासून वाढीव वेतन लागू करण्यात आली. मात्र एप्रिल २०२० ते मार्च २०२४ या कालावधीची थकबाकी प्रलंबित आहे. सदर थकबाकी कामगारांना मिळणे आवश्यक आहे.

राज्य शासकीय कर्मचा-यानां  जानेवारी, २०२५ पासून महागाई भत्ता ५३ टक्क्यावरुन ५५ टक्के लागू झालेला असून सदर ५५ टक्के महागाई भत्ता ऑगस्ट, २०२५ च्या वेतनासोबत थकबाकीसह अदा करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे एस.टी. कामगारांनाही  जानेवारी, २०२५ पासून ५५ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह लागू करावा.

एस.टी. कामगारांना दिवाळीनिमित्त रू.१५,०००/- दिवाळी भेट देण्यात यावी,  कामगार कराराच्या तरतुदीनुसार एस.टी. कामगारांना दिवाळीच्या सणाला रू.१२,५००/- उचल देण्यात यावी.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने एस.टी. महामंडळामध्ये २५ हजार कायम कर्मचा-यांची भरती करणार असे जाहिर केलेले असताना,  आता १७,४५० कंत्राटी कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एस.टी. महामंडळाचे खाजगीकरण होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. राज्यभरात एस.टी. कामगारांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. एस.टी. महामंडळामध्ये कंत्राटी पध्दतीने कामगारांची भरती करण्यास कृती समितीचा सक्त विरोध असून कंत्राटी पध्दतीऐवजी नियमित कामगारांची भरती करण्यात यावी. तसेच पी.पी.पी.तत्वावर महामंडळाच्या जागांचे विकसन करण्याऐवजी महामंडळाने सदर जागा स्वतः विकसित करणे आवश्यक आहे. तसेच भाडे तत्वावरील EV गाडयांनी देखील महामंडळाचा प्रचंड तोटा होत आहे ते धोरण बंद करुन स्वमालकीच्या EV गाडया घेण्यात याव्यात. सेवानिवृत्त एस.टी. कर्मचा-यांची थकीत आर्थिक देणी एक रक्कमी देण्यात यावीत, सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना सर्व गाड्यांमध्ये १ वर्षाचा मोफत पास देण्यात यावा. तसेच सदरची सवलत विद्यमान कर्मचा-यांनाही लागू करण्यात यावी. प्रलंबित आर्थिक व अन्य मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी  १३ ऑक्टोबर २०२५ पासून महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर आंदोलनातील मागण्यांची सोडवणूक न झाल्यास सदरच्या आंदोलनाची व्याप्ती राज्यभरातील सर्व विभागात अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे. कृती समितीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, कास्ट्राईब रा.प. कर्मचारी संघटना, शिव परिवहन वाहतूक सेना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन, राष्ट्रीय एस.टी. कामगार कॉग्रेस (इंटक), बहुजन परिवहन अधिकारी-कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व राष्ट्रीय एस.टी. कामगार कॉग्रेस या संघटना सहभागी आहेत. पत्रकार परिषदेला संदीप शिंदे,  हनुमंत ताटे,  हिरेन रेडकर,  संतोष शिंदे, बंडू फड, अरूण विरकर इत्यादि कामगार संघटनांचे  पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel