माणगाव येथे एसटी कामगार संघटनेचे महाअधिवेशन संपन्न*

रायगड:  महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ५७  वे महाअधिवेशन ५  मे २०२५  रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे अतिशय थाटामाटात पार पडले. या अधिवेश...


रायगड:  महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ५७  वे महाअधिवेशन ५  मे २०२५  रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे अतिशय थाटामाटात पार पडले. या अधिवेशनाला महाराष्ट्रातून ४० हजार एसटी कर्मचारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मा.  प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले,  त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांचा ५३ % वाढीव महागाई भत्ताचा निर्णय याच महिन्यात घेतला जाईल. महिलांचे  काम ८ वाजेपर्यंत संपेल. त्याचप्रमाणे लवकरच  तातडीने  भरती करण्यात येईल,  असे आश्वास दिले. उद्योग मंत्री मा. उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांना यापुढे आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. रोजगार हमीमंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या भाषणात  सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मी सदैव एक पाऊल पुढे राहील. खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,  एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य कर्मचाऱ्या एवढे होण्यासाठी मी अर्थमंत्र्याकडे निश्चित पाठपुरावा करील.

याप्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, आमदार रवीभाऊ धगेकर. महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, सम्यकचे प्रमुख आनंद पवार इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. युनियनचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी कामगारांच्या मागण्यांचे सलामी देणारे तडाखेबाज भाषण केले, तर अध्यक्ष संदीप शिंदे यांचे भाषण निर्णय घ्यायला भाग पाडणारे होते. स्वागताअध्यक्ष विलास खोपडे यांनी सर्वांचे सुंदर स्वागत केले..

या अधिवेशनामुळे एसटी कामगार संघटनेची ताकद तर वाढलीच,  परंतु बार्गेनिग  पॉवर देखील वाढली.

या अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर निर्णय घ्या, प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास आंदोलनाचा इशारा, एसटी उद्योगाच्या बळकटी  आणि एसटी को-ऑपरेटिव बँकेच्या गैर कारभाराबाबत असे चार ठराव मंजूर करण्यात आले. ठरावाप्रमाणे मागण्या मंजूर न झाल्यास संपासह सर्व तऱ्हेचे आंदोलन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 

आपला  

 मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group