पांडे यांच्या " तिच्या खिडकीतलं आभाळ" कथा संग्रहाचे प्रकाशन


..     नांदेड येथील लेखिका रोहिणी पांडे लिखित "तिच्या खिडकीतलं आभाळ" या कथा संग्रहाचे प्रकाशन दि.२४ मे २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता हॉटेल विसावा, शिवाजी नगर नांदेड, येथे संपन्न होनार आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा व्याख्याते प्रा.डॉ. गणेशराव सोनाळे राहनार आहेत . तर कथा संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य मा. देविदास फुलारी यांचे शुभहस्ते होनार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक आशा पैठणे, कथाकार श्री धनंजय गुडसुरक ह  उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन ग्रामीण कथाकार तथा पत्रकार राम तरटे हे करनार आहेत.हा कथा संग्रह म्हणजे स्त्री विश्वातील विविध पैलुंना स्पर्श व प्रतिबिंबित करनारा आहे. वरिला मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होना-या कार्यक्रमास व ललित कला प्रतिष्ठान नांदेड व मुकुंद पांडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

टिप्पण्या