अर्धापूर: दाभड पाटीजवळ रस्ता ओलांडत असताना अर्धापूर ते नांदेड जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने दिलेल्यजोरदार धडकेत २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. गोविंद बालाजी सवंडकर (वय २८ वर्षे) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. तो मूळचा हापसापुर (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील रहिवासी असून, सध्या ह.मु. दाभड (ता. अर्धापूर) येथे राहत होता.
सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार गोविंद सवंडकर हा दाभड पाटीकडून दाभड गावाकडे रस्ता ओलांडून जात होता. याच वेळी अर्धापूर ते नांदेड जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गोविंद रस्त्यावर दूरवर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक राजू पाचंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमीस तात्काळ अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज डाढाळे यांनी गोविंदची तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी व एक तिनं वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे सोवनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दाभड आणि हापसापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS