उदगीर शहरात नेहमीच गुणवतेत आघाडीवर असलेल्या उदयगिरी अकॅडमीत काल परवा दहावीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा चक्क घोड्यावर मिरवणूक काढून उदयगिरी अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचा वेळोवेळी गौरव करणे, त्यांना प्रेरणा देणे हया अकॅडमीचे वैशिष्ट्ये आहे.शिष्यवृत्ती, नवोदय, स्पर्धा परीक्षा, दहावीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा इथे सत्कार केला तेही वेगवेगळ्या स्वरूपात केला जातो. मान - अभिमान, यश - कीर्ती या बाबीचा बारकाईने अभ्यास केला तर असे उपक्रम घेण्यासाठी माणूस आपोआप प्रवृत्त होतो. तसे या अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व! शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा सर्व क्षेत्राला स्पर्शून गेलेले हे व्यक्तिमत्व सातत्याने नवनवीन उपक्रम घेवून विध्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करते. गुणवतेबरोबरच इतर बाबींचीही विदयार्थ्यांना ज्ञान व्हावे हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो.विशेष बाब म्हणजे उदयगिरी अकॅडमीचा शिष्यवृत्तीच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी चि. कृष्णा बब्रुवान पाटील यांची युपीएससी परीक्षेतून आय. ए. एस. ( जिल्हाधिकारी ) म्हणून निवड झाली. ही बाब अभिनंदनीय अशीच आहे.
2011 ला गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रा. गोपाळकृष्ण घोडके सरांनी उदयगिरी अकॅडमीची सुरुवात केली. चार पाच विद्यार्थ्यापासून सुरुवात झालेल्या या उदयगिरी अकॅडमीचे आज वटवृक्षात रूपांतर झाले.शेकडो विध्यार्थी आज इथे शिक्षण घेतात. अनेक तज्ञ शिक्षकांची टीम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. शिस्त, संस्कार आणि शांततेचे धडे या अकॅडमीत मिळतात. गणित, इंग्रजी, विज्ञान, संस्कृत, स्पर्धा परीक्षा, एम. पी. एस. सी., युपीएससी, राज्यसेवा, 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, नवोदय अशा अनेक विषयांचे व परीक्षेचे येथे मार्गदर्शन केले जाते. इय्यता दहावीच्या परीक्षेत गेल्या अनेक वर्षापासून या अकॅडमीचे विद्यार्थी 100 पैकी 100 टक्के गुण घेवून उत्तीर्ण होतात. अकॅडमीचा दहावीचा निकाल 100 टक्के लागतो.शिष्यवृत्ती परीक्षा वा स्पर्धा परीक्षेत या अकॅडमीचे विद्यार्थी यश संपादन करून शिष्यवृतीस पात्र ठरतात. या अकॅडमीत शिक्षणाबरोबरच स्वावलंबनाचे धडे दिले जातात. शिक्षणाबरोबरच महापुरुषाची व त्यांच्या कार्य व बलिदानची ओळख व्हावी म्हूणन अकॅडमीत महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला जातो. तसेच विध्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून दिनविशेष साजरे केले जातात. विविध परीक्षेत, स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विध्यार्थ्यांचा मान्यवरांना पाचरण करून त्यांचा विध्यार्थ्यासमोरच सत्कार केला जातो.त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते. उदगीर शहरात विविध संस्था संघटनाच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी विद्यार्थी पाठवले जातात. त्याठिकाणी या अकॅडमीचे विद्यार्थी यश संपादन करीत असतात.विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. पर्यटन, तीर्थष्ठान, देवस्थान, गड किल्ले, लेण्या आदी विविध ठिकाणी सहल घेवून गेली जाते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवण्याचा अकॅडमीचा उद्देश असतो. या अकॅडमीत यश मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांचा यथोचित सन्मान केला जातो.कधी प्रमाणपत्र वाटप, कधी कॅलेंडर वाटप, स्मृतिचिन्ह वाटप, कधी शाल श्रीफळ देवून तर कधी फेटे बांधून विध्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. कालपरवा तर दहावीचा निकाल लागताच या अकॅडमीत यश मिळविलेल्या विध्यार्थ्यांचा चक्क घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली नंतर सत्कार करण्यात आला.प्रसंगही तसाच होता. यावर्षी दहावीच्या परीक्षेत या अकॅडमीचे विद्यार्थी धनश्री मोरे, स्वरांजली पंचडे आणि श्रेया कुलकर्णी या तीन विद्यार्थ्यांनी दहावीला 100 पैकी 100 गुण घेवून उत्तीर्ण झाले. तसेच विश्वजीत घोडके, पृथ्वीराज बिचकुंदे आणि धनश्री मोरे या विद्यार्थ्यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले. तसेच या अकॅडमीच्या 44 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले.या सर्व विदयार्थ्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली आणि अमेरिकेत रसायन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. राम बब्रुवान आंब्रे व गणित तज्ञ सचिन शेळके यांचे हस्ते त्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
माणूस हा सातत्याने समाधान शोधत असतो. कोणी संपत्ती मिळवून समाधानी होतात. तर कोणी संततीचे यश पाहुन समाधान होतात. पण उदयगिरी अकॅडमीचे प्रा. गोपाळकृष्ण घोडके व त्याची टीम ही विद्यार्थ्यांचे यश पाहुन समाधान होतात. असंच म्हणावे लागेल. प्रा. गोपाळकृष्ण घोडके सरांची टीम प्रा. संतोष पाटील, प्रा. डॉ. धनंजय पाटील, प्रा. ज्योती खिंडे, प्रा. श्रीगन रेड्डी, प्रा. नंदिनी निटुरे, प्रा. निवेदिता भंडारे, प्रा. गोविंद केंद्रे यांचेही या अकॅडमीच्या यशात महत्वपूर्ण योगदान आहे. प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांच्या उदयगिरी अकॅडमीचा गुणवतेचा आलेख वरचेवर वाढत जावो ही सदिच्छा!
शंकर बोईनवाड
पत्रकार, उदगीर
addComments
टिप्पणी पोस्ट करा