नवी मुंबई शिवसेना उबाठा गटाचे विभाग प्रमुख, सानपाडा सिताराम मास्तर उद्यानातील ७.५० ग्रुपचे अतिशय देखणे, कर्तुत्ववान, सर्वांचे लाडके सामाजिक बांधिलकी जपणारे निसर्गप्रेमी, गणेशोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह सारख्या प्रत्येक कार्यात अत्यंत धडाडीने नेतृत्व करणारे सानपाड्याच्या प्रगतीसाठी स्वतःला झोकून देणारे, अतिशय सुंदर वक्तृत्व व निवेदक, समाजकार्यासाठी जीवन अर्पण करणारे आणि सानपाडा रहिवाशांच्या सुखदुःखामध्ये सतत सहभागी होणारे समाजसेवक श्री. अजय पवार साहेब यांना १ मे २०२५ रोजी सकाळी गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या ४८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! याप्रसंगी सानपाड्याचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, शिवसेना शिंदे गटाचे अजित सावंत, पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, शिवसेना उपविभाग प्रमुख बाबाजी इंदोरे, शिवसेना शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील, भारतीय जनता पार्टीचे राजू सैद, ७.५० ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे, आदी मान्यवरांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य सांगून वाढदिवसानिमित्त अजय पवार यांच्या सामाजिक कार्याचा गुणगौरव केला. अजय पवार यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य लाभो अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा