खानदेशस्तरीय वाड्.मय पुरस्कार डॉ. प्रकाश सपकाळे (जळगाव) आणि डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार ( साक्री ) यांना विभागून देण्यात येणार आहे. ५००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील हे साक्षेपी समीक्षक व सर्जनशील साहित्यिक होते. मराठी साहित्य व संशोधन क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते. प्राचार्य किसन पाटील यांच्या विद्यार्थ्यांकडून ज्ञानपरंपरा स्थापन करून दरवर्षी वाङ्मय पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा पाचोरा यांच्यातर्फे पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी आलटून पालटून एका वाङ्मय प्रकारासाठी हे पुरस्कार दिले जातात. मराठी साहित्यक्षेत्रात हे पुरस्कार अत्यंत मानाचे समजले जातात. दरवर्षी देखण्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.
नांदेड येथील सिद्धहस्त लेखक, समीक्षक आणि व्यासंगी अभ्यासक डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘बालसाहित्यातील नवे काही ‘ या समीक्षाग्रंथाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा ग्रंथ पुण्यातील चेतक बुक्स ह्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. डॉ. अनंता सूर (यवतमाळ) यांच्या ‘साहित्य समाज आणि विचारधारा' या समीक्षाग्रंथांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार विभागून दिला जाणार आहे.
खानदेशस्तरीय पुरस्कार जळगाव येथील बहिणाबाईच्या कवितेचे चिकित्सक अभ्यासक डॉ. प्रकाश सपकाळे यांच्या ‘समीक्षाविवेक’ या ग्रंथासाठी आणि साक्री येथील अभ्यासक डॉ. नरेद्र बापूजी खैरनार यांच्या ‘मंचीय कवितेचा स्वरूपशोध’ या ग्रंथांना विभागून जाहीर झाला आहे. ५००० रूपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मराठी साहित्यक्षेत्रात या पुरस्काराने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. सन 2021पासून हे पुरस्कार दिले जातात.
2021 साली कथा: मनोहर सोनवणे(पुणे), युवराज पवार , 2022 साली कविता : पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी(नंदूरबार), उषा हिंगोणेकर (जळगाव) आणि 2023 साली कादंबरी : ज्ञानेश्वर जाधवर(पुणे), विलास मोरे (एरंडोल) , 2024 साली वीरभद्र मिरेवाड(नांदेड) व प्रशांत असनारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव), सौ. नीता शेंडे ( पाचोरा) यांना बालसाहित्य या वाङ्मय प्रकारांसाठी हे पुरस्कार दिले गेले.
2025 या वर्षीच्या पुरस्कारासाठी समीक्षा हा साहित्यप्रकार आमंत्रित होता. लवकरच पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र साहित्य परिषद, पाचोरा शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव वले आणि प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्या वतीने डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी कळविले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा