*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त*
मुंबई - नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.
अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या.
त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.
दिनांक 04.04.2025 रोजी 08.00 वा. सुमारास पोलीस स्टेशन लिंबगाव हद्दीत, मौ.आलेगाव, ता.जि नांदेड येथे, वसमत तालुक्यातील मौ.गुंज येथील रहिवासी असलेले शेतमजूर महिलांना हळद काढणीसाठी घेऊन जाणारा ट्रॅक्टर, बरोबर जोडलेल्या ट्रॉलीसह विहिरीत पडुन सात जणांचा मृत्यू झाला आहे.सदरील घटनेमध्ये *ताराबाई सटवाजी जाधव (वय ३५), ध्रुपता सटवाजी जाधव (वय १८), सरस्वती लखन बुरड (वय २५), सिमरन संतोष कांबळे (वय १८), चउत्राबाई माधव पारधे (वय ४५), ज्योती इरबाजी सरोदे (वय ३५) सपना तुकाराम राऊत (वय २५)* यांचा मृत्यू झाला
"नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. आज सकाळी हा प्रकार घडला आहे. या महिला हळद काढणीच्या कामासाठी निघल्या
"मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीतील गुंज गावातील महिला हळद काढणीच्या कामासाठी जात असताना ट्रॅक्टरच्या चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे. पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून आमदार राजेश नवघरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत."
"याबाबत महसुल विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 महिला व एक पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव (जि.नांदेड) शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या. या मजुंरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती आहे. यातील 2 महिला आणि एक पुरुष है सुदैवाने बचावले."
आम्ही न्यूज़ अपडेट करत आहोत ………
addComments
टिप्पणी पोस्ट करा