परभणी ( परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन वतीने आंतरराष्ट्रीय टे.टे. क्रीडा स्पर्धेत कु. आद्मा महेश बाहेती हिने जागतिक युवा मालिका टेबल टेनिस स्पर्धेत 11 वर्षाखालील वयोगटात तृतीय क्रमांक ( ब्रांझपदक ) पटकावले तर शालेय राष्ट्रीय टे .टे. क्रीडा स्पर्धेत कु. शरयु माधव टेकाळे हिने जळगाव येथील राज्य मानांकन स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले राज्य निवड चाचणी मधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली तर 14 वर्षा आतील शालेय महासंघकडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाल्याबद्दल त्यांचा परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशन च्या वतीने रोख 5000/-रु धनादेश ,शाल श्रीफळ देवुन सत्कार जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.माधव शेजुळ , प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांनी केला.याप्रसगी डॉ . महेश बाहेती, माधव टेकाळे, सारिका टेकाळे, पूजा बाहेती उपस्थित होते.
या यशस्वी कामगिरी बद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता,महाराष्ट्र राज्य टे.टे संघटना अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, संजय कडू, ॲड अशीतोष पोतनीस, आशिष बोडस,सर्व पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, माजी सहसंचालक क्रीडा चंद्रकांत कांबळे,राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, रोहन औढेंकर परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर , जिल्हा सचिव तथा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, संतोष सावंत, परभणी क्लबचे सचिव डॉ.विवेक नावंदर, पवन कदम, पियूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी,साक्षी देवकाते, भक्ती मुक्तावार या वरिष्ठ खेळाडू, पालक यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा