'यशवंत ' मध्ये महिला दिनानिमित्त स्पर्धा उत्साहात संपन्न


नांदेड:(दि.१ एप्रिल २०२५)

               यशवंत महाविद्यालयात महिला सुधार व सुरक्षा समितीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

               मेकअप, हेअर स्टाईल, मॅचिंग, रॅम वॉक इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

              या स्पर्धांना विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थिनींनी मेकअप, मॅचिंग, हेअर स्टाईल या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

               स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे होत्या. महिला सुधार व सुरक्षा समितीच्या समन्वयीका डॉ.मंगल कदम तर प्रमुख अतिथी तथा परिक्षक म्हणून सौ. भावना जेठवानी तथा मेकअप आर्टिस्ट श्री. धम्मपाल धुळे होते. 

               मॅचिंग कॉम्पिटिशनमध्ये विविध विद्यार्थिनींनी महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती, बंगाली लुकमध्ये आपली उपस्थिती दर्शविली होती. तर काही विद्यार्थिनींनी अत्यंत सुरेख अशी केशभूषा केली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून मुलींमध्ये आत्मविश्वास निश्चितच वाढण्यास मदत झाली. मुली अत्यंत मुक्तपणे या स्पर्धेमध्ये उतरल्या होत्या.

              स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ. एल. व्ही. पद्माराणी राव, डॉ.नितारानी जैस्वाल, डॉ. संगीता शिंदे(ढेंगळे), डॉ. अर्चना गिरडे, प्रा.राजश्री भोपाळे, प्रा. संगीता चाटी, डॉ.दीप्ती तोटावार, डॉ. कविता केंद्रे, डॉ. रत्नमाला मस्के, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा. प्रियंका शिसोदिया, प्रा.सविता वाकोडे, डॉ. वानखेडे, आदी महिला प्राध्यापिकांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या