नवी मुंबई सानपाडा येथील अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अखिल सानपाडा रहिवाशी महासंघ यांच्या वतीने १४ व्या वर्षी हिंदू मराठी नववर्ष व गुढीपाडवा निमित्त गणेश मंदिरापासून निघालेली भव्य शोभायात्रा अत्यंत उत्साहात, जल्लोषात आणि आनंदामध्ये यशस्वीरित्या संपन्न केली. ही शोभायात्रा गणेश मंदिर, केमिस्ट भवन, मराठा भवन, सेक्टर ८, सेक्टर ३, बधाई स्वीट्स, सेक्टर १०, न्यू मिलेनियम हॉस्पिटल, मिलेनियम टॉवर, गणेश मंदिर, अशा पद्धतीने काढण्यात आली होती. यामध्ये रथ, ढोल पथक, लेझीम नृत्य, रांगोळी, वारकरी भजन मंडळ. पारंपारिक वेशभूषा इत्यादी आकर्षण मोठ्या प्रमाणात होते. सदर शोभायात्रेत नवी मुंबईचे माजी महापौर संदीप नाईक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, आमदार मंदा म्हात्रे यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, नगरसेविका कोमल वासकर, माजी नगरसेवक शंकर माटे, समाजसेवक मिलिंद सूर्याराव, पांडुरंग आमले, भाऊ भापकर, आबा जगताप, विकास वाघुले, महेश बनकर, अखिल सानपाडा रहिवासी महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजने,सह सचिव अजय पवार,सुनील चव्हाण आणि खजिनदार श्रीकांत चव्हाण व सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सानपाड्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मराठा विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोबत अजय पवार आणि विजय वीरकर यांच्या संयोगाने गामी ग्रुप नवी मुंबई यांच्या वतीने यात्रा सुरू होताना आणि बधाई स्वीट येथे नाष्टा,मिठाई, ज्यूस आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा