सेलू जि.परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू येथे गांधी प्राकृतिक चिकित्सा एवं योग मंडळ व श्रीरामजी भांगडिया रुग्णसेवा मंडळ यांच्या वतीने होळीनिमित्त शुक्रवारी, १४ मार्च रोजी सेलूकरांनी मातीस्नानाची परंपरा यंदा एकोणिसाव्या वर्षीही जपली.
सेलू येथील चंद्रप्रकाश सांगतांनी व गंगाधर शेरे पाटील यांच्या शेतात धुलिवंदनानिमित्त मातीस्नानाचा उपक्रम सुरू झाला. करोना काळाचा अपवाद वगळता हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे. या वर्षी सोमवारी मंठा रोडवरील शिवनारायण मालाणी यांच्या शेतातील ॲग्रो टुरिझम अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हॉटेल परिवार फार्म रेस्टॉरंट परिसरातील निसर्ग सानिध्यात पारंपरिक मातीस्नानाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने प्राचीन संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला गेला. रंगाचा वापर न करता, नैसर्गिक व वैज्ञानिक पद्धतीने धुलिवंदन साजरे करण्यात येते. यामुळे उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. मातीस्नानानंतर कडधान्यमिश्रित उसळ, आर्युवेदिक काढा देऊन पाहुणचार केला जातो. गांधी प्राकृतिक चिकित्सा मंडळाचे समन्वयक तथा संयोजक शिवनारायण मालाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राजू केंडे, मनोहर चौधरी (परभणी), प्रेमगोपाल कासट (मंठा), आनंद बाहेती, गोविंद कासट, रामवल्लभ राठी, प्रवीण माणकेश्वर, रेवा कुंदनानी, सुभाष मोहकरे, बाबासाहेब हेलसकर, कृष्णा काटे, ईश्वर जैन, राम सुरवसे, भगवान पावडे, शेख मुमताज, शेख फिरोजखान, शेख आझाद, भास्कर घोडके, रोहित काला, ज्ञानोबा ताठे, गंगाधर कान्हेकर आदींनी पुढाकार घेतला. विकास भुते, सुनील गायकवाड, सतीश जाधव, प्रवीण जंबुरे, करणसिंग, किरण चौधरी, अक्षय हुगे, शुक्राचार्य शिंदे, सुमीत व्यंकटकर , आदिंसह विविध क्षेत्रातील ४२ नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. राघव काटे, युवराज गायकवाड, स्वराज जाधव, कु आरोही ढवळे या बालकांनीही मातीस्नानाचा आनंद घेतला.
मृदास्नानाला आयुर्वेदात अतिशय महत्व आहे. वारुळाची माती, अश्वगंधा ,शतावरी,वैखंट, चंदन , निमपत्र, जेष्ठमद , गाईचे शेण, गोमुत्र, तुरटीचे पाणी, आदींचे मिश्रण करूण चार दिवस पाण्यात भिजवण्यात येते. तसेच तिळ तेल व लसूण तेलाणे मालीश केल्या नंतर शरीरावर मातीचा लेप लावण्यात येतो. तासभर उन्हात बसून सुकवला जातो. त्यानंतर सचैलस्नान केले जाते. ऋतुचक्रा प्रमाणे मातीस्नान शरीराला उपकारक ठरते.
शिवनारायण मालाणी
संयोजक तथा समन्वयक महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा एवं योग मंडळ सेलू

addComments
टिप्पणी पोस्ट करा