नवी मुंबई सानपाडा येथील शिव संघर्ष प्रतिष्ठान आयोजीत होळी करा लहान, पोळी करा दान या उपक्रमाला सर्व सानपाडावासीयांनी भरघोस प्रतिसाद दिला, तसेच या उपक्रमाचे सर्वांनीच खूप कौतुक केले. होळी करा लहान, पोळी करा दान* या उपक्रमाच्या माध्यमातून साधारण ११०० पुरण पोळी (नैवद्य) सानपाडा वासियांनी समाजसेवक बाबाजी इंदोरे यांच्या नेतृत्वाखालील शिव संघर्ष प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेकडे जमा केल्या.
जमा केलेली पुरण पोळी आणि इतर अन्न पदार्थ स्त्री मुक्ती संघटना कोपरखैराने व तुर्भे येथील संस्था मार्फत गरजूंना वितरीत करण्यात आल्या. सानपाडा वासियाकडून जमा केलेल्या पोळी दानामुळे भुकेल्या जीवांना एक दिवस का होईना आपण सणासुदीच्या दिवशी पोटभर अन्न देऊ शकलो.
या संपूर्ण कार्यात सानपाडावासीयांचे मोलाचे योगदान लाभले. यापुढेही असेच सहकार्य करून, विविध समाज उपयोगी उपक्रम यशस्वी करू. या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व सानपाडावासियांचे बाबाजी इंदोरे यांनी आभार मानले.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा