*सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन सोहळा संपन्न*


नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने  ९  मार्च  २०२५ रोजी  श्री. सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. या निमित्ताने भाविकांचे मनोरंजन म्हणून प्रासादिक भजन झाले. सदर कार्यक्रमास संस्थापक बी. आर. शेजाळे, एल. बी.  नलावडे, सानपड्यातील माजी  नगरसेवक सोमनाथ वास्कर, शंकर  माटे, समाजसेवक मिलींद सूर्याराव, अजय पवार, तान्हाजी चव्हाण,  बाबाजी इंदोरे, दत्तात्रय कुरळे, विसाजी लोके,  रामचंद्र पाटील, अविनाश जाधव, मारुती विश्वासराव, शिवाजी पाटणे, रणवीर पाटील, बाळू थोरात,  ज्ञानेश्वर काळे,  मारुती शिंदे,  नाना शिंदे, अष्टविनायक भजन मंडळाचे मनोहर लांडे, आदी मान्यवरांनी भेट दिली. या संघातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. या ज्येष्ठ नागरिक संघाची सभासद संख्या जवळ जवळ  १२०० असून संघातर्फे दर महिन्याला आनंद मेळावे भरून ज्येष्ठांचे  वाढदिवस साजरे केले जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर गुन्हेविषयी मार्गदर्शन,  आरोग्य तपासणी,  सहली, महिला व पुरुषांसाठी योगा वर्ग, प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन, राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती, इस्कॉन अधिवेशनात सहभाग. कॅरम, बुद्धिबळ, गायन, वेशभूषा सारख्या  फेस्कॉनच्या स्पर्धेत सहभाग इत्यादीसारखे  सामाजिक उपक्रम राबविले जातात.  कार्यक्रम  आयोजनासाठी संघाचे अध्यक्ष मारुती कदम. उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, डॉ. विजया गोसावी,  खजिनदार विष्णुदास मुखेकर, सह खजिनदार सुभाष बारवाल, बळवंतराव पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी जेष्ठांना स्नेहभोजन देण्यात आले.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या