*अ.भा. ग्राहक पंचायत ची मागणी*
*गंगाखेड (प्रतिनिधी)*
15 मार्च जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून यंदाही "ग्राहक जागरण पंधरवाडा" दिनांक 15 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 दरम्यान साजरा करण्यासाठी तहसीलदार यांना दिनांक 13 मार्च रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने निवेदन देण्यात आले.
या उपक्रमाद्वारे शासनाच्या ग्राहक हिताच्या योजना, आवश्यक माहिती आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, वस्त्या, ग्रामीण भागातील खेडी येथे पथनाट्य, निबंध स्पर्धा, महिला मंडळांचे कार्यक्रम, शेतकरी मेळावे यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहक साक्षरता वाढवण्याचा उद्देश आहे.
विशेषत: नवा ग्राहक संरक्षण कायदा, अन्नसुरक्षा, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, सायबर गुन्हे आणि डिजिटल फसवणूक याविषयी माहिती देणे, तसेच खरेदी व्यवहारातील कायदे, वैद्यमापन शास्त्र, अन्न व औषध प्रशासन यांसंबंधी ग्राहकांचे मूलभूत अधिकार या विषयांवर प्रबोधन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव टोले, तालुकाध्यक्ष गोपाळ मंत्री, शहराध्यक्ष सुधाकर चव्हाण, सचिव सय्यद ताजुद्दीन, अॅड. उत्तम काळे (शहर सचिव), कोषाध्यक्ष महेमूद शेख, शहर संघटक प्रभू राठोड, जिल्हा सदस्य प्रतिभा वाघमारे, मंजुषा जामगे, सूर्यमाला मोतीपवळे, सुनिता घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
(छायाचित्र: निवेदन देताना पदाधिकारी)

addComments
टिप्पणी पोस्ट करा