नांदेड:( दि.२९ मार्च २०२५)
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील बी.एससी. शाखेचा पदवीधर विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) कॅडेट प्रथमेश विनायक मुंडे यांची भरती महानिदेशक, संरक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने १२१ व्या तुकडीसाठी भारतीय सैन्य दलातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या लेफ्टनंट पदासाठी निवड झाली आहे.
या प्रतिष्ठित निवडीबद्दल माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी प्रथमेश मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रा.कैलास दाड, लोकप्रशासन विभागातील लेफ्टनंट डॉ. रामराज गावंडे, लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, अधीक्षक गजानन पाटील, सैन्य दलातील पी.आय. स्टाफ श्रीहरी मुंडे यांची उपस्थिती होती.
अखिल भारतीय १५१ वी रँक प्राप्त झालेल्या आणि चेन्नई येथे पुढील प्रशिक्षणासाठी ३० मार्च रोजी रुजू होणाऱ्या प्रथमेश मुंडे यास डॉ.रामराज गावंडे, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील लेफ्टनंट डॉ.किशोर इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सुयशाबद्दल उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, सहसमन्वयक डॉ.साहेब शिंदे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार,जगन्नाथ महामुने, आदींनी अभिनंदन केले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा