नवी मुंबई सानपाडा युवा सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्ताने नेत्र तपासणी शिविराचे आयोजन शिवसेना शाखा सानपाडा गाव येथे करण्यात आले होते. सदर शिबिराचा सानपाडा विभागातील १०० हून अधिक रहिवाशांनी लाभ घेतला. सहभागी उपस्थित रुग्णांची नेत्र तपासणी केले असता ११ रुग्णांस मोतीबिंदु असल्याचे निदान झाले. त्या ११ रुग्णांपैकी ३ रुग्णांवर २६ मार्च २०२५ रोजी शिवसेना नगरसैविका सौ.कोमल सोमनाथ वास्कर हयांच्या वाढदिवसा निमित्त साईं सृष्टि नेत्र रुग्णालयाचे डॉ.राजपाल उसनाले यांच्यावतीने विनाशुल्क मोतिविंदु शस्त्रक्रिया करण्यात आली. माजी नगरसेवक सोमनाथ भास्कर व सौ. कोमल वासकर यांनी डॉ.राजपाल उसनाले यांना धन्यवाद दिले.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा