निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कृती कार्यक्रम शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*



सेलू (.               ) येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय सेलू यांच्या वतीने श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात दि. १३ मार्च रोजी निपुण भारत अभियाना अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कृती कार्यक्रम कार्यशाळा व शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली .

        या वेळी व्यासपीठावर श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक रवी पाठक, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शितोळे, नूतन विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणेश माळवे केंद्र प्रमुख एकनाथ जाधव आदीची प्रमुख उपस्थिती होती.

             या वेळी महाराष्ट्र शासनाच्या 5 मार्च 2025 रोजी च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार प्राथमिक स्तरावर इयत्ता 2 री ते 5 वी च्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कृती कार्यक्रम विषयी सखोल मार्गदर्शन केंद्र प्रमुख एकनाथ जाधव यांनी केले. ते म्हणाले की हे अभियान 5 मार्च 2025 ते 30 जुन 2025 पर्यंत असणार आहे.इयत्ता 2 री ते 5 वी च्या विद्यार्थ्यासाठी हे अभियान अनिवार्य असून विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्यात देखील ऑनलाईन ऑफलाईन सराव घ्यायचा आहे. तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी या वर्गासाठी ऐच्छिक आहे.

            भाषा विषय कृती कार्यक्रम विषयी विजय जोशी यांनी मार्गदर्शन केले.गणित विषय कृती कार्यक्रम विषयी सचिन शहाणे यांनी माहिती दिली तर निपुण भारत अभियान पार्श्वभूमी विषयी योगेश ढवारे यांनी माहिती दिली. प्रशिक्षणार्थी अनिल रत्नपारखी, सौ.अनुराधा कानडे यांनी मनोगत व्यक्त केले.

       या शिक्षण परिषदेस कन्या सेलू केंद्रातील 1 ली ते 8 वी चे एकूण 181 शिक्षक उपस्थित होते.

          सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश ढवारे यांनी केले.

टिप्पण्या