नांदेड:(दि.२१जानेवारी २०२५)
इयत्ता बारावीच्या परीक्षा दि.११ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च या कालावधीत संपन्न होणार आहेत.सदरील परीक्षेत विविध मार्गाने होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळ आपल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवितात.
या अनुषंगाने यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना मंडळाच्या आदेशानुसार दि. २१ जानेवारी रोजी कॉपीमुक्तीची शपथ देण्यात आली.
या उपक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस.व्ही फाजगे यांनी केले. तदनंतर प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांनी कॉपीमुक्त शपथेचे वाचन केले.
याप्रसंगी प्रा.एस.एन. शेळके, प्रा. नरेंद्र कंचटवार, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट प्रा. एस.व्ही सोमठाणकर, प्रा. आर. जे. जमदाडे, डॉ.मुकेश धर्मले आणि प्रा.एम. एस. कनशेट्टे उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.के.आर.रबडे, पर्यवेक्षिका प्रा. व्ही.जी.बदने, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

COMMENTS