नांदेड:(दि.२१जानेवारी २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात दि. २० जानेवारी रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करताना, सद्यस्थितीत उच्च शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे. या बदलाला सामोरे जाण्यासाठी यशवंत महाविद्यालय देखील आधुनिक शैक्षणिक साधनसामग्रीने सुसज्ज होत आहे. महाविद्यालयामध्ये स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट लॅबोरेटरी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या शैक्षणिक साहित्याचा वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त नवीन संकल्पना आणि ज्ञान पोहोचण्याचे कार्य केले जात आहे. बदलत्या काळाबरोबर संशोधन आणि रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होत आहेत; परंतु या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कौशल्याधारित शिक्षण असणे आवश्यक आहे. जर हे कौशल्यपूर्ण शिक्षण नसेल तर निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नाही; म्हणून खऱ्या अर्थाने कौशल्याधारित शिक्षण आजच्या काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन पालक शिक्षक मेळावा समितीने केले होते.
प्रारंभी प्रास्ताविक पालक शिक्षक मेळावा समितीचे संयोजक डॉ.शिवराज शिरसाठ यांनी केले.
पालक प्रतिनिधी सौ.ज्योती डोंगळीकर यांनी, महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण आणि स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद केले, सौ.भावना सोलंकी यांनी, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महाविद्यालय शिक्षक आणि प्राचार्य यांची भूमिका विशद केली, सुधाकर राठोड यांनी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले तर प्रमोद पवार यांनी, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांबरोबरच पालकांची देखील भूमिका महत्त्वाची आहे, असे मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन डॉ डी.डी.भोसले यांनी केले.
याप्रसंगी समिती सदस्य डॉ. धनराज भुरे,डॉ.रमेश चील्लावार, प्रा.चिकटे, डॉ.मिरा फड, प्रा. नखाते,डॉ.प्रवीण मिरकुटे, प्रा.निलेश चव्हाण, प्रा. एन. बी. गव्हाणे, प्रा. एस.एस. वाकोडे, डॉ. साहेबराव शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, पालक प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

COMMENTS