*भगवान रजनीश नगर कीर्तन उत्साहात संपन्न*


 नांदेड:( दि.१३ जानेवारी २०२५)

           भगवान रजनीश ब्लेसिंग इंटरनॅशनल मेडिटेशन कम्यूनतर्फे पौर्णिमेनिमित्त दि.१३ जानेवारी रोजी नांदेड क्लब सायन्स कॉलेज रोडवर नगर कीर्तन उत्साहात संपन्न झाले.

            'गोविंद बोलो हरी गोपाल बोलो' या कीर्तनाच्या शब्दचालीवर आधारित गीत गायन, नृत्य व ध्यान ओशो संन्यासी, प्रेमी आणि साधकांनी केले.

            या नगर कीर्तनामध्ये स्वामी प्रेम प्रशांत, मा प्रेम सुगंधा, तुलसी पेंट्सचे ओनर स्वामी आनंद सुरेश उर्फ श्री.सुरेश धूत, सौ.संगीता देशमुख, अमृता मुखेडकर, मा वंदना, यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अजय गव्हाणे, महेश वडजकर, स्वामी बोधी जागरण, शामसुंदर मोतेवार, सेवानिवृत्त अधिकारी माधवराव जोंधळे आदींनी सहभाग घेतला.

           नगर कीर्तनाच्या यशस्वीतेसाठी भगवान रजनीशद्वारे संन्यासीत स्वामी गोपाळ भारती, माजी उपमहापौर व सेवानिवृत्त प्रा. सुनील नेरळकर, श्री भागवत आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या