परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने दि. २५ नोव्हेंबर नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोखर्णी येथे टेनिस व्हॉलीबॉल खेळांचा प्रसार प्रचार करण्यासाठी राज्य सचिव गणेश माळवे यांनी कार्यशाळेत शालेय 60 मुले मुलीना टेनिस व्हॉलीबॉल खेळांची प्रात्यक्षिके व माहिती दिली.
याप्रसंगी माळवे म्हणाले भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळ हा पुणे येथे डॉ व्यंकटेश वांगवाड सरांनी सुरू केला, या खेळांच्या 25 राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संपन्न होऊन महाराष्ट्र राज्य संघाने सुवर्णपदक प्राप्त करत आहे.
हा खेळ कमी खर्चिक, कमी साहित्य, कमी जागेत खेळण्यात येतो यामुळे संपूर्ण देशात लोकप्रिय झाला आहे. या खेळातून भरपूर व्यायाम मिळून आरोग्यदायी खेळ आहे. हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत खेळाला जातो, केंद्रिय क्रीडा मंञालय दिल्ली यांची मान्यता मिळाली आहे.
टेनिस व्हॉलीबॉल प्रात्यक्षिके आंतरराष्ट्रीय खेळाडू सिध्दांत लिपने यांनी खेळाडूंना प्रात्यक्षिके खेळवून दाखवली. नाविन्यपूर्ण खेळातून खेळाडू आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी प्राचार्य पी.बी. शेळके , प्रा. नागेश कान्हेकर, मा.नगरसेवक मनिष कदम, जेष्ठ शिक्षक एन. एन.पवार, क्रीडा शिक्षक माणिक कदम, प्रा. संजय गजमल, गणेश धोपटे, सुनील गवई, उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ञ्यंबक वडसरकर, तर आभारप्रदर्शन पवार यांनी मानले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा