रामदातीर
माहूर (प्रतिनिधी )नांदेड जिल्ह्यातील हदगांव, हिमायतनगरसह विविध तालुक्यातील हजारो महिलांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळावे व पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी माहूरगड येथे श्री रेणुका मातेला हजारो महिलांनी महाआरती करून साकडे घातले.
एकनाथ शिंदे यांनी मागील दोन वर्षा पूर्वी मुख्यमंत्री पदाची शपत घेतल्या पासून महाराष्ट्र सुखी समृद्धी व्हावा या साठी ते दिवसरात्र काम करत होते.त्यांनी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आणली. याच लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरून यश टाकले. याचे पूर्ण श्रेय महायुतीचे कॅप्टन म्हणून पाहिल्या जात असलेले शिंदे यांनाच जाते. त्यामुळे ज्या भावाने आम्हाला स्वावलंबी बनवले तोच भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसावा अशी लाडक्या बहिणींची इच्छा असल्याचे या महिलांनी बोलून श्री रेणुका गडावर पाई चालत मातेची महाआरती करून शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी भावनिक साकडे घातले.यावेळी आमचा लाडका भाऊराया अर्थात एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे अशी इच्छा उपस्थिती महिलांनी व्यक्त केली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा