बसस्थानकाचे स्थलांतर अबचलनगर ऐवजी इतरत्र करा

 अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.      नांदेड/प्रतिनिधी- नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वेस्थानक दरम्यानचा रस्त्या...



 अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.

     नांदेड/प्रतिनिधी- नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वेस्थानक दरम्यानचा रस्त्याची दुरावस्था झाल्याने  या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी नांदेड बसस्थानकाचे स्थलांतर करण्याकरिता अबचलनगर येथील मोकळी जागा निवडण्यात आली आहे. यास सिख समाजाचा तीव्र विरोध असल्याने  बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्थानिक शीख समाज यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

     शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वेस्थानक दरम्यानच्या रस्त्याची सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे बस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर अबचलनगर येथे करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु या भागामध्ये शीख धर्मीय नागरिक बहुसंख्येने राहत असल्याने बसस्थानकाचे परिसरात स्थलांतर झाल्यास येथे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची रेलचेल सुरू होईल. शीख धर्मीयांमध्ये प्रतिबंधित असणारे सिगारेट, तंबाखू, गुटखा यांची  सेवन परिसरात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे व ते टाळणे मोठे अवघड काम आहे त्यामुळे यावरून प्रवासी नागरिक व रहिवाशी शीख धर्मीय नागरिकांमध्ये भांडण तंटे निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास शीख समुदायाचा अबचलनगर येथे बसस्थानक स्थलांतर करण्यास विरोध आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने गुरुद्वारा बोर्डाची कोणतीही सल्लामसलत व परवानगी न घेता सदर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे लक्षात येत आहे. गुरुद्वारा बोर्डाने नेहमीच शहर विकासाच्या कामांमध्ये सहकार्य करीत सुमारे 250ते 350  एकर जमीन नांदेड विकास कामानिमित्त जमीन दिली असुन आज पर्यंत मोबदला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली नाही. कोविड काळामध्ये देखील गुरुद्वारा बोर्डाच्या अधीन असलेले यात्री निवासांमध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या मोबदल्याची रक्कम अद्याप पूर्णपणे देण्यात आली नाही.

   बाबा फत्तेसिंघजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष स.मनबीरसिंघ ग्रंथी व स्थानिक शीख समाज यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत व गुरुद्वारा बोर्ड प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघजी यांना निवेदन देऊन अबचलनगर परिसरात बसस्थानकाचे स्थलांतर करण्याऐवजी इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी केली आहे. अन्यथा या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे 

     या निवेदनावर बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे या निवेदनावर  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी, बिरेंद्रसिंघ नारायणसिंघ बेदी, भोलासिंघ भुजंगसिंघ गाडीवाले, मनिदरसिंघ (राज) गुरबचनसिंघ रामगडीया, जसबीरसिंघ महेंद्रसिंध बुंगई, जसपालसिंघ ग्यानसिंघ लांगरी, मनप्रितसिंघ अवतारसिंघ कारागीर, बक्षीसिंध भिमसिध पुजारी, दिपकसिंघ रतनसिंघ गल्लीवाले, जगजीतसिंघ खालसा, परशनसिंघ दर्शनसिंध नहेंग, रविद्रसिंघ मोदी,

अवतारसिंघ पहेरेदार, सरताजसिंघ सुखमनी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel