*नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत* *भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी

नांदेड, दि. 23 नोव्हेंबर :-  नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट...



नांदेड, दि. 23 नोव्हेंबर :-  नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भिमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव चव्हाण, नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद तिडके, लोहा विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर, नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार, देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून डॉ. तुषार राठोड हे विजयी झाले आहेत. 


नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभांपैकी भारतीय जनता पार्टीला 5 जागा, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1 अशा एकुण 9 जागा निवडून आल्या आहेत. तर विधानसभेसोबतच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी झाले आहेत आज झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहे. 


*83-किनवट* विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भिमराव रामजी केराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे जाधव प्रदीप नाईक यांचा 5636 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये भिमराव रामजी केराम यांना 92856 मते मिळाली तर जाधव प्रदीप नाईक यांना 87220 मते मिळाली आहेत. यामध्ये उमेदवार जाधव सचिन माधवराव (नाईक) यांना 5511 तीसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर चौथ्या क्रमांकावर अशोक संभाजीराव ढोले यांना 5311 मते मिळाली आहे. 


*84-हदगाव* विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांचा 30067 एवढ्या मतांनी पराभव केला आहे.

या निवडणुकीमध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांना 113245 मते मिळाली तर माधवराव पाटील जवळगावकर यांना 83178 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप आला राठोड यांना 11409 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार देवसरकर माधव दादाराव यांना 1276 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 


*85-भोकर* विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांचा 50551 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये श्रीजया अशोकराव चव्हाण यांना 133187 मते मिळाली तर तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांना 82636 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश टिकाराम राठोड यांना 8872 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर बहुजन समाज पार्टीचे कमलेशकुमार पांडूरंगराव चौदंते यांना 1664 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 



*86-नांदेड उत्तर* विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अब्दुल सत्तार अ गफुर यांचा 3502 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर यांना 83184 मते मिळाली तर अब्दुल सत्तार अ गफुर यांना 79682 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत विराज इंगोले यांना 24266 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगीता विठ्ठल पाटील  यांना 22706 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 


*87-नांदेड दक्षिण* विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंद शंकर तिडके यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे यांचा 2132 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये आनंद शंकर तिडके यांना 60445 मते मिळाली तर मोहनराव हंबर्डे यांना 58313 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुक अहमद यांना 33841 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर दिलीप कंदकुर्ते  यांना 17170 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 


*88-लोहा* विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे एकनाथ रावसाहेब पवार यांचा 10973 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 72750 मते मिळाली तर एकनाथ रावसाहेब पवार यांना 61777 मते मिळाली आहेत. जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार चंद्रसेन ईश्वरराव पाटील (सुरनर) यांना 29194  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर प्रा. मनोहर बाबाराव धोंडे यांना 20302 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 


*89-नायगाव* विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे राजेश संभाजीराव पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा 47629 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये राजेश संभाजीराव पवार यांना 129192 मते मिळाली तर डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना 81563 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. माधव संभाजीराव विभुते यांना 16043  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर प्रहर जनशक्ती पार्टी गजानन शंकरराव चव्हाण यांना 2144 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.


*90-देगलूर* विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांचा 42999 एवढ्या मतांनी पराभव केला आहे.

या निवडणुकीमध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना 107841 मते मिळाली तर निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांना 64842 मते मिळाली आहेत. प्रहर जनशक्ती पक्षाचे उमेदवार साबणे सुभाष पिराजीराव यांना 15919  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देगलुरकर सुशिलकुमार विठ्ठलराव यांना 5403 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.


*91-मुखेड* विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तुषार राठोड यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा 37784 एवढ्या मतांनी पराभव केला आहे.

या निवडणुकीमध्ये तुषार राठोड यांना 98213 मते मिळाली तर हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना 60429 मते मिळाली आहेत. बालाजी नामदेव खतगावकर यांना 48235  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रावसाहेब दिगांबरराव पाटिल यांना 4700 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.


00000

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group