इन्नरव्हील क्लब नांदेड ची डीसी विज़िट संपन्न


 आज दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी इन्नरव्हील क्लब नांदेड ची डीसी विज़िट हॉटेल आतिथी येथे उत्साहात संपन्न झाली. या विज़िट साठी इन्नरव्हील क्लब च्या डिस्ट्रिक्ट चेयरमैन डॅा. शोभना पालेकर उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत जि, प. प्राथमिक शाळा येथील मुलिंनी लेझिम पथक व स्वागत गीताने केले.डाॅ शोभना पालेकर यांनी नांदेड येथील इन्नरव्हील टीम चा या वर्षीच्या सर्व कार्याचा आढावा घेतला. सर्व सदस्यांनी आपल्या कार्याचा अहवाल त्यांना सादर केला. या वेळी बोलताना डॅा. शोभना पालेकर मॅडम यांनी सर्व सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले व काम समाधानकारक आहे असे सांगितले. या वेळी त्यांनी पुढील कार्यासाठी काही नवीन संकल्पनाही दिल्या आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छ्या दिल्या. यावेळी इन्नरव्हील क्लब नांदेड तर्फे सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांच्या सोईसाठी बेंचेस देण्यात आले,एका गरजू महिलेला रोजगाराचे साधन म्हणून शिलाई मशिन देण्यात आली, गरीब होतकरू विद्यार्थ्याला सायकल देण्यात आली तसेच कौठा येथील झेडपी शाळेला शालेय साहित्य देण्यात आले. ही विज़िट यशस्वी होण्यासाठी प्प्रेसिडेंट विमल येन्नावार, व्हॉइस प्रेसिडेंट मीनाक्षी पाटील, आयपीपी जायश्री राठोड,सेक्रटरी सोनाली देशमुख, जॉइंट सेक्रेटरी रेखा शर्मा, ट्रेझरर डॅा. उर्मिला मालू, आयएसओ मोनल रस्तोगी, एडिटर डॅा. मुग्धा देशपांडे, सीसी सुनीता चौहान,सीएलसी मेनका डेंझील यांनी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॅा.विद्या पाटिल यांनी केले. या कार्यक्रमासाठी आशा लव्हेकर, डॅा. चित्रा पाटिल,डाॅ.पल्लवी तुंगेनवार, मीना काबरा,अलका काबरा,सविता नांदेडकर,सुजाता मैया, वर्षा ठक्कर, अनिता गित्ते,निर्मला जाजु,उर्मिला सोनी,डाॅ.पुष्पा गायकवाड, कीर्ती सुस्तरवसर, कल्याणी हुरणे,कृष्णा मंगनाळे,प्रतिमा दस्तापुरे, दीपाली पालीवाल,रिटा गुप्ता व डाॅ पल्लवी तुंगेनवार व सर्व इन्नरव्हील सदस्यांची वेशेष उपस्थिती होती. डाॅ अंजली चौधरी व शितल यन्रावार ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.


टिप्पण्या