नांदेड:( दि.२४ नोव्हेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील साक्षी मात्रे, शीतल जाधव, राधिका माने, सुप्रिया उमाटे, नेहा उमाटे, शशांक गाडेकर, वैष्णवी सेवनकर, शिवानी सपुरे, शीतल आढाव या नऊ विद्यार्थ्यांची ग्राउंड झिरो संशोधन इंटर्नशिपअंतर्गत प्रत्येकी १२ हजार रुपये मानधनावर निवड करण्यात आली होती.
इंटर्नशिपअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड करणारे यशवंत महाविद्यालय हे संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम व विद्यार्थ्यांना रोजगार देण्याच्या दिशेने पाऊल उचलणारे अग्रणी महाविद्यालय आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दररोज आठ तास प्रशिक्षण देण्यात आले असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
सर्व प्रशिक्षित विद्यार्थी हे बी.ए., बी.कॉम. व बी.एससी. शिक्षणप्रक्रियेतील असून हे प्रशिक्षण भविष्यात रोजगार प्राप्तीच्या ध्येयासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल; अशा शुभेच्छा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान, शुभेच्छा व सत्कार सोहळा प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, इंटर्नशिप कमिटीचे समन्वयक डॉ. विजय भोसले, सदस्य उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.संदीप खानसोळे, डॉ. श्रीकांत जाधव, डॉ.अजय मुठे, प्लेसमेंट गायडन्स सेलचे समन्वयक डॉ.मदन अंभोरे, डॉ. एन.बी.चव्हाण, डॉ.ए.एस.कुवर, डॉ. मोहम्मद आमेर, डॉ.नारायण गव्हाणे, डॉ.वाय.टी.नकाते, डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ.रत्नमाला म्हस्के यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि यशस्वीतांचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी अभिनंदन केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा