अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येत आहे. आजच्या अंकात सोबत असलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार आहेत.तसेच उद्याच्या शेवटच्या भागात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार असल्यामुळे वाचकांना ही लेख माला कशी वाटली याबद्दल मोजक्या शब्दात प्रतिक्रिया ९४२१८ ३९३३३ या व्हाट्सअप क्रमांक वर पाठवाव्या ही विनंती. - संपादक
---------------------------------------------------------------
*प्रा. डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार*
माय हॉलिडेज आणि भाऊ ट्रॅव्हल्स नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंदमान टूर द्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील अंदमान प्रत्यक्षात उतरविण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजकांनी केला. 25 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान अंदमान टूर मधून एकूण 60 प्रवासी अंदमान बेटाचा मनसोक्त आनंद लुटले. या प्रवासाचे खरे आकर्षण समुद्र, निसर्ग ,जंगल, बोटीचा प्रवास त्याच सोबत मोठे जहाज म्हणजेच क्रूज मधून अविस्मरणीय असा प्रवास झाला. यामुळेच आनंद आणि समाधान लाभले व तणावमुक्ती झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर व अनेक राष्ट्रभक्त हुतात्म्यांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला बलिदान व शहिदांचे स्मरण सेल्युलर जेलमधून प्रत्यक्षात दिसून आले. सेल्युलर जेल मधील लेझर शो अस्मरणीय ठरला. याशिवाय मनसोक्त निसर्ग सौंदर्य डोळ्यात, मनात टिपता आले. ज्येष्ठ प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करत वेळेवर रुचकर नाश्ता, जेवण, चहा, पाणी, झोप याची काळजी घेण्यात आली. संपूर्ण प्रवास आनंददायी व खेळीमेळीचा होता. खासकर अनुभव संपन्न ॲड.दिलीप ठाकूर सोबत असल्यामुळे सहलीचा आनंद द्विगणित झाला.
अशा अनेक धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक सहलींचा अनुभव असल्यामुळे त्यांनी व्यवस्थितरित्या, नियोजनबद्ध अंदमान टूर घडवून आणला. त्यांच्यातील सातत्यपूर्ण प्रयत्न, संपर्क आणि संवाद व संदीप मैद सरांच्या टीमचे व्यवस्थापन यामुळेच ही अंदमान यात्रा सुखकारक ठरली. शेवटी पोर्ट ब्लेअर येथील विमानतळावर सामूहिक रित्या सादर केलेले जयस्तुते हे गीत पुन्हा एकदा विमानात सादर करण्याची दिलीपभाऊंची कल्पना अफलातून त्यांनी मला लीड करण्याची संधी दिली.यातून देशभक्ती, राष्ट्रभक्ती याचे अतुलनीय दर्शन घडले. अंदमानच्या बेटावरून ही लेखमाला दररोज आठ ते दहा वृत्तपत्रातून छापून यायची यातून दिलीपभाऊंची लेखन शैली उत्तम असल्याची प्रचिती झाली.अंदमान टूरचा पुन्हा पुन्हा आनंद घेता यावा यासाठी त्यांचे सर्व लेख मी मोबाईल मध्ये जपून ठेवले आहे. त्यांचे लेख वाचून अनेकांनी मला आम्हालाही अंदमानला दिलीप भाऊंच्या टीम सोबत जायचे असे आवर्जून सांगितलेले आहे. यामुळे संपूर्ण टीमचे अभिनंदन व त्यांच्या पुढील अंदमान टूर ला शुभेच्छा
*योगगुरू रमेश केंद्रे*
मनातील अंदमान टूर्स प्रत्यक्ष उतरवण्यासाठी प्रयत्न करणारी माय हालीडेज ,भाऊ ट्रॅव्हल्स चे दिलीपभाऊ ठाकूर, संदीपजी, विशाल मुळे,किरण मोरे, जयंतजी व सर्व कार्यालयीन कर्मचारी यांचे प्रथम अभिनंदन.
स्वातंत्र्यवीर सावरकर व अनेक राष्ट्रभक्त हुतात्म्यांच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेली सर्वोच्च बलिदानाचा लेजर शो पाहिल्यावर मन सुन्न झालं.निसर्ग, समुद्र किनारे, जंगल, जहाज, विमान प्रवास तसेच निवास भोजन व्यवस्था व्यवस्थापन वाखाणण्याजोगे होते.सातत्य, संपर्क,व संवाद या तिन सुत्रा नुसार ही टिम कार्यरत आहे.नांदेड वासियांनी माय हालिडेज,भाऊ ट्रॅव्हल्सचा अधिक अधिक फायदा घेऊन पर्यटनातून तणाव मुक्ती, व्यक्तीमत्व विकास, सामाजिकदृष्ट्या व आध्यात्मिक विकास करून घ्यावा.पुनश्च टिम चे अभिनंदन
*तुकाराम इंद्राळे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता*
श्री दिलीपभाऊ, संदिपजी आणि जयंत यांच्या संयुक्त सुक्ष्म व दूरदृष्टी नियोजनामुळे आंदमान ट्रीप सुंदर सोईस्कर व अफलातून पार पडली. या ट्रीप मध्ये खूप काही नवीन अनुभव व अनोखे निसर्ग सौंदर्य पाहावयास मिळाले. या टूर बद्दल मी लिहिलेल्या काव्यपंक्ती.
संदीप आणि दिलीप भाऊ माय हॅालीडेजची शान
त्यांनी काढला टुर त्यांचं नाव आंदमान
हौशी गौशी आणि म्हातारांचा उत्साह भारी
एक एक मोजता मोजता भरले ५०च्या वरी
माय हॅालीडेजची टीम आंदमानला पोहोचली
काळ्यापाण्याची सजा काय असते येथे ऊमजली
क्रुर कर्मट इंग्रज ते हैवान
स्वतंत्र्यासाठी सावरकरासह अनेक विरानी लढले बेभान
रॅास आणि नॅार्थ बे आयलंडची छबी न्यारी
रीफ कोरलचा आनंद सर्वानी लुटला भारी
येथे एका पेक्षा एक तरा जनू ड्रेसिंग चा मेला
नवरोबा मात्र ओझे वाहून वाहून थंड झाला
सर्वात सुंदर,बीच राधानगर, हे भारताचे अभिमान
काही पोहले बीचवर खेळले काही बाकड्यावर लोळले सर्वझाले मस्तीवान
आंदमान सागरी, क्रूझची सफारी,ऊत्साह ओसंडून वाही
डॉल्फिनची मस्ती व सागर लहरी सोबतीला ठाई ठाई
वेडी वाकडी वळणे, हिरवीगर्द झाडी, आलो सुंदर वनात
हे तर आंदमानचे दाट जंगल येथे राहतात जारवा जमात
बाराटांगच्या खाडीत,मॅाग्रोव्हच्या बनात, बोट करते थरार
चुनखडीची लेणी किती अजब हा तर निसर्गाचा चमत्कार
आमची ट्रीप मस्त आणि झकास झाली निर्विवाद
माय हॅालीडे व भाऊ ट्रॅव्हल्सच्या टीमला आम्ही देतो धन्यवाद
आम्ही देतो धन्यवाद
*प्राचार्य डॉ राम जाधव,प्रा.डॉ.सौ.कल्पना जाधव नांदेड.*
माय हालिडे आणि भाऊ ट्रेव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अंदमान ट्रीपचा प्रवास एक सुखद अनुभव देणारा ठरला.दिलीप ठाकूर भाऊ, संदिप मेड सर, विशाल मुळे सर, जयंत सर, आणि किरण सर या सगळ्यांचे उत्तम सहकार्य लाभले.नाश्ता, जेवण, निवासाची व्यवस्था वाखाणण्याजोगी होती.एकमेकांचे को- आर्डिनेशन मस्त होते.नेतृत्वगुण व हजरजबाबीपणा यामुळे ही ट्रीप मस्त झाली.सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
*उषा गैनवाड, मराठीच्या शिक्षिका*
पहिली माझी ओवी ग
दिलीपभाउंना
सहल नेली अंदमानला गोविंदा, गोविंदा
दुसरी माझी.
संदीपजी भाउंना
आओ,आओ सगळे म्हणा गोविंदा .
तिसरी माझी..
जयंत वाणीला
10-10 चा ग्रृप करा
गोविंदा .
चौथी माझी..
सहलीच्या मैत्रीनींना
मनसोक्त आनंद लुटला
गोविंदा.
पाचवी माझी..
ओझे घेणार्या भावांना
ओझे पाहून कुली पळाले
गोविंदा.
सहावी माझी..
जमलेल्या सर्वांना
परत आपण भेटु या
गोविंदा.
सातवी माझी..
विनंती करते सर्वांना
प्रचार, करू या माय हाॅलीडे व भाऊ ट्रॅव्हलस चा
गोविंदा,गोविंदा.
*आशा चेके*
ट्रिप खूप खूप छान झाली. अन्नदान, नेत्रदान,रक्तदान करता करता दिलीपभाऊ आपण आनंदाचे दान करत आहात.पैसे असूनही फिरायला जाण्यासाठी योग्य कंपनी मिळत नाही ते काम करण्याचा विडा आपण उचलून नांदेडकरांना आनंद देता आहात. त्याबद्दल भाऊ आपले व माय हॉलिडे टीमचे खूप खूप धन्यवाद.
*सौ.सुरेखा व सुभाष भिसे.*
अंदमान टूर मध्ये जंगलाची सफर, समुद्राची सफर व विमानाने हवेतून सफर अशा वेगवेगळ्या सफरीचा अद्भूत असा अनुभव आला.ह्या बेटाला निसर्गाच खूप मोठ वरदान आहे.ईथे असलेली कमालीची स्वच्छता सुद्धा मनाला भावनारी आहे.विमानातून जात असताना बाजुला बिहारचा एक प्रवासी बसला होता.तो अंदमानच्या लोकांविषयी सांगत होता,इथले लोक प्रामाणीक, नियम पाळनारे व खूप समाधानी आहेत.टूर खूप छान झाला, नियोजन उत्तम होते.दिलीपभाउ ठाकूर, संदीप सर, विशाल मुळे , किरण मोरे व जयंत वानी सर्वांचे उत्तम सहकार्य लाभले.
*प्रा.बालाजी कोटलवार*
श्री दिलीपभाऊ,संदीप मेड आणि जयंत वाणी यांच्या टीम ने आम्हा सेवानिवृत्त्यांची अंदमान सहल छान व सुखरूप पुर्ण केली.राहण्याची सोय व रोजच्या नाष्टा व जेवण ही उत्तम होती. असेच सहल नियोजन भविष्यात करावे. अनोख्या प्रकारचा हा आनंद ज्येष्ठ नागरिकांना आपणाकडून मिळत राहील अशी अपेक्षा करतो.
*ऊद्घव चौधरी,सेवानिवृत गट निदेशक ,आयटीआय,वैष्णवी नगर नांदेड*
माय हाॅलीडे व भाऊ ट्रॅव्हल्सची अंदमान सहल यशस्वी व निर्विघ्न पार पडली. हे सर्व दिलीपभाऊ ठाकुर , संदिप मैंद , जयंत वाणी माय हाॅलीडे ची टीम यांच्या सामुहीक प्रयत्नामुळे शक्य झाले.या टूर मध्ये जास्तीत जास्त सिनिअर सिटीजन मंडळी सहभागी होती.या सर्व मंडळीचा विचार करूनच कोणताही त्रास होणार नाही या कडे बारकाईने लक्ष दिल्या गेले.विशेषत:वेळेवर रूचकर नास्ता ,जेवण ,चहा व पाणी याची उत्तम व्यवस्था करण्यात आली.त्यामुळे कोणालाही कसलाही त्रास झाला नाही.या मुळेच आपल्या सोबत पुन्हा पुन्हा यावे वाटते.
आपणास एक विनंती आहे,महिला स्पेशल गोवा टूर प्रोग्रॅम तयार करावे या सहलीस पण आपणास चांगला प्रतिसाद मिळेल.माय हाॅलीडे टीम व भाऊस धन्यवाद.
*सुधीर गोविंदराव देशपांडे, महावीर नगर हिंगोली*
माय हाॅलीडेज व भाऊ ट्रॅव्हल्स ने आयोजीत केलेली अंदमान टुर ही आमची त्यांच्या सोबतची दुसरी टुर. यापूर्वी आम्ही मागील वर्षी त्यांच्या सोबत केरळ टुरला गेलो होतो त्यासारखाच अनुभव याही टुरला आला.अप्रतिम सुंदर नियोजन.स्वतः दिलीपजी ठाकुर हे संदीप मैंद आणि जयंत वाणी यांचे सोबत या टुरमधे सहभागी झाल्यामुळे कुठेही कमतरता पडली नाही.आयोजन खुपच निटनेटके,जेवणाची व्यवस्था उत्कृष्ट या सर्व बाबींमुळे आमची अंदमान टुर संस्मरणीय झाली धन्यवा
*सौ मैथिली व मुकुंद पांडे*
माय हॉलीडे कडून आयोजित करण्यात आलेली अंदमान ट्रिप खुप छान झाली.मला अंदमान ला जाण्याची खुप ईच्छा होती .ती माय हॉलीडे मुळे पुर्ण झाली. दिलीप भाऊ,संदीप सर, जयंत सर ,कीरणसर यांनी ट्रीप मध्ये आमची खुप काळजी घेतली. त्यामुळेच आम्ही अंदमान येथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करु शकलो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमानतळावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जयोस्तुते हे गाणे सर्वांनी एक सुरात सादर केले. तिथे असलेले ईतर प्रवासी सुध्दा आमच्यात सामील झाले ही दिलीप भाऊ ची कल्पना खूपच आवडली.सहल खूप छान झाली. दिलीपभाऊ ठाकूर सोबत असल्यामुळे अजून चांगली झाली. टीम मधील सर्वांचे मनापासून आभार
*उज्वला केंद्रे*
खुप दिवसांपासुन अंदमानला जाण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली, सर्व व्यवस्था एकदम उत्तम होती, आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही.सहली मधील सगळे सोबती छान मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यामुळे टुर अतिशय छान झाला. ट्रीप प्रमुख श्रीयुत दिलीप ठाकुरभाऊ, संदीप सर, जयंत सर यांनी सर्व व्यवस्था उत्तम छान केली, खुप खुप धन्यवाद
*ॲड. विजया इंद्राळे*
अंदमानचा टूर नेहमीप्रमाणे एकदम छान झाला.जेवण, हॉटेल एकदम उत्तम. थँक्स दिलीप भाऊ, संदीपजी व जयंत
* *डॉ . प्रकाश लालपोतू वसमत नगर.*
माय हॉलिडे आयोजित अंदमान टूर मध्ये सौ सह सहभागी झालो होतो. त्यांच्या सोबत ची ही पहिलीच टूर. सुरवातीला दोन दिवस व्यवस्थापन नियोजन शून्य होते .समन्वयाचा अभाव होता.त्या मुळे नाराज झालो. तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि सुधारणा झाली .बाकी निवास व्यवस्था. नाश्ता जेवण अतिशय उत्कृष्ट होते worth what we paid for. नमूद केलेली सर्व पर्यटन स्थळ दाखविली गेली. अंदमान ट्रीप चे राहिलेले स्वप्न पूर्ण झाले. ग्रुप मधील सर्व सहभागी सदस्य एक मेकांशी खेळी मेळीत राहिले. एकंदरीत ट्रीप आनंददायी झाली. माय हॉलिडे टीम ला धन्यवाद.
*वसुंधरा प्रकाश लालपोतू, वसमत*
अंदमान टूर एकदम छान झाली. जेवणाची राहण्याची उत्तम सोय होती. आम्हाला काहीही त्रास झाला नाही. ठाकूरसर संदीपसर ,जयंतचे आभार.
*रमेश जयकर, सेवानिवृत्त बँक मॅनेजर*
अंदमान ट्रीप.एक अतिशय सुंदर अनुभव जो आम्हाला my Holidays tours यांच्या कडून अनुभवता आला.आमच्या सहली मधील सगळे सोबती खूप मनमिळाऊ होते...विशेष म्हणजे जास्त लोक जेष्ठ नागरिक होते .ट्रीप मॅनेजर श्रीयुत दिलीपजी ठाकूर, संदीपसर, व जयंत यांच्या अतिशय चोख व्यवस्थापन या मुळे ट्रीप मध्ये कुठेही अडचण आली नाही.तसेच प्रत्येक हॉटेल खूप आरामदायी होते.रोजच्या नाश्ता,जेवणाची लज्जत तर खूपच भारी.या ट्रीप मुळे रेल्वे, विमान,जहाज, पाताळ या चारही मधून सफर करायला मिळाला .
*सौ.विजया व माजी न्यायाधीश विजय कुलकर्णी*
Dilip Bhau. Trip organised by you very nicely. We are very happy. Thanks.
*सुधीर देशपांडे*
Special Thanks to tour arranger My Holidays and Bhau travels.Tour is very memeobil and very inspirabl.
*विशेष आग्रहाची विनंती*
उद्याच्या शेवटच्या भागात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार असल्यामुळे वाचकांना ही लेख माला कशी वाटली याबद्दल मोजक्या शब्दात प्रतिक्रिया आज सायंकाळपर्यंत ९४२१८ ३९३३३ या व्हाट्सअप क्रमांक वर पाठवाव्या ही विनंती.
(क्रमशः)
addComments
टिप्पणी पोस्ट करा