सेलू (बातमीदार)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणा बरोबरच खेळ देखील अतिशय महत्त्वाचा असून आजच्या आधुनिक काळात खेळातून ही करिअर च्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्यामुळे खेळाडूंनी खेळाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे असे आवाहन राज्य पुरस्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक सतीश नावाडे यांनी केले.
क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक ३ आक्टोबर रोजी आयोजित तालुका मैदानी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डी डी सोन्नेकर,प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक दिलीपराव सुरवसे, प्रा नागेश कान्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मैदानी स्पर्धेसाठी तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक खेळाडू धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी,रीलेनिंग, हातोडा फेक,इत्यादी मैदानी खेळात मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर रामा गायकवाड यांनी आभार मानले स्पर्धा यशस्वीते साठी पंच म्हणून संजय भूमकर,राहूल घांडगे, प्रभू शिंदे, राजेश राठोड, भारत घांडगे, सुरज शिंदे, प्रा रवी दवे, कैलास टेहरे, शुभम पवार आदींनी परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा