नादेड: (दि.३ ऑक्टोबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील "ॲक्टिव्ह फोरम व डेनिस रिची आयटी क्लब:२०२४-२५" या दोन्ही अभ्यास मंडळाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे व उपप्राचार्य डॉ. एच.एस.पतंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व नवनवीन तंत्रज्ञान वापरून विविध स्पर्धा, कार्यक्रम संपन्न व्हावेत; या हेतुने या दोन अभ्यास मंडळाचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांद्वारे संपादित संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञानातील विविध विषयावर आधारित भित्तिपत्रक विमोचनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक विद्यार्थी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शुभांगी मिटकरी, मोहित देशमुख, उपाध्यक्ष दुर्गेश चव्हाण, मोनिका जाधव, सचिव सुमित ठाकरे, लक्ष्मण बोडके, सहसचिव अनुष्का जयस्वाल, दीपाली आवळे, खजिनदार अब्दुल मुद्दशीर, महेश उपलवाड व या दोन्ही अभ्यास मंडळाचे इतर सर्व सभासद यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विभागप्रमुख डॉ.एस.जी.जाधव, अभ्यास मंडळाचे समन्वयक डॉ.प्रवीण तामसेकर , प्रा.गुरुप्रसाद चौसटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विभागातील प्रा.पी.बी. पाठक, प्रा.नितीन नाईक, प्रा.सीमा शिंदे, प्रा.आमरीन खान,प्रा.सचिन वडजे, प्रा. चेतन देशमुख ,प्रा.नीलम अग्रवाल, प्रा. अफरोज सिद्दिकी यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचलन कु.अनुष्का जयस्वाल व कु. साक्षी नरवाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रबंधक संदीप पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, माणिक कल्याणकर, अनुराधा मती यांनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा