मुंबई दि.२: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूतपूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी राष्ट्रीय विभूतींना अभिवादन केले आहे. त्यावेळी केलेल्या अभिवादनाच्या भाषणात गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे, महात्मा गांधी देश स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर समर्पित जीवन जगले.मात्र गांधीजींच्या त्यागाचा आज विसर पडत चालला आहे.आज देशात अजुनही जातीय दंगे होऊन,परस्परातील बंधुभाव नाहिसा होऊ लागला आहे.ही गोष्ट महात्मा गांधीं तत्वांना विसंगत आहे.तेव्हा देश पुढे न्यायचा असेल तर महात्मा गांधी आणि भतपूर्व लालबहाद्दुर शास्त्री यांची शिकवण विसरून चालणार नाही,असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण यांनीही राष्ट्रपुरुषांना आदरांजली वाहिली.प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.•••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा